Asian Games 2023 | तिरंदाजी रिकर्व्हमध्ये भारतीय पुरुष संघाला रौप्यपदक, पदक संख्या ९० | पुढारी

Asian Games 2023 | तिरंदाजी रिकर्व्हमध्ये भारतीय पुरुष संघाला रौप्यपदक, पदक संख्या ९०

पुढारी ऑनलाईन : आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीच्या रिकर्व्ह प्रकारात भारताच्या पुरुष संघाने आज रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अतनू दास, तुषार शेळके आणि धीरज बोम्मादेवरा या त्रिकुटाचा रिकर्व्हच्या अंतिम फेरीत दक्षिण कोरियाने ५-१ असा पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धेचा आजचा १३ वा दिवस आहे. भारतीय पुरुष संघाने उपांत्यफेरीत बांगलादेशचा २-० ने पराभव केला होता. (Asian Games 2023) तिरंदाजीच्या रिकर्व्ह प्रकारात भारताच्या पुरुष संघाने रौप्यपदक जिंकून पॅरिस २०२४ ऑलिम्पिकसाठी पात्रता निश्चित केली आहे.

भारताचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे ९० वे पदक आहे. भारताने आतापर्यंत २१ सुवर्ण, ३३ रौप्य आणि ३६ कांस्यपदके मिळून ९० पदके मिळवली आहेत. भारत पदकतालिकेत चौथ्या स्थानी आहे.

संबंधित बातम्या 

दरम्यान, आज याआधी अंकिता भकत, भजन कौर आणि सिमरनजीत कौर या महिलांच्या त्रिकूटाने रिकर्व्ह प्रकारात कांस्यपदक जिंकले. त्यांनी व्हियतनाम महिलांच्या संघावर ६-२ अशी मात केली. याआधी रिकर्व्ह प्रकारात भारताच्या महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत जपानचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली होती. पण त्यांचा उपांत्य फेरीत कोरियाकडून ६-२ असा पराभव झाला होता.

काल गुरुवारी १२ व्या दिवशी भारताच्या तिरंदाजीत कंपाऊंडमध्ये महिला संघाने सुवर्णदक जिंकले होते. ज्योती वेण्णम, आदिती स्वामी आणि प्रनीत कौर यांनी चायनीज तैपेईच्या महिला संघाला २३०-२२८ असे हरवत सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर काल भारताने पुरूष कंपाऊंड संघानेही सुवर्ण पदकाची कमाई केली होती. तिरंदाजीत महिला कंपाऊंड (सांघिक) पाठोपाठ पुरूष कंपाऊंड (सांघिक) गटाने देखील सुवर्णवेध कामगिरी करत पदक मिळवले होते. भारताच्या ओजस, अभिषेक आणि प्रथमेश या त्रिकुटाने पुरुषांच्या तिरंदाजी कंपाऊंड स्पर्धेत कोरियाचा पराभव करत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली होती. (Archary Asian Games 2023)

त्याआधी तिरंदाजीच्या कंपाऊंड मिश्र सांघिकमध्ये भारताच्या ओजस देवतळे आणि ज्योती वेण्णम यांनी सुवर्णवेध घेतला होता. त्यांनी अंतिम फेरीत सो चावोन आणि जू जाहून या कोरियन जोडीला १५९-१५८ असे हरवत सुवर्णपदक मिळवले होते.

हे ही वाचा :

Back to top button