Asian Games 2023 Kabaddi | कबड्डीत भारताने पाकिस्तानला चारली धूळ; अंतिम फेरीत धडक | पुढारी

Asian Games 2023 Kabaddi | कबड्डीत भारताने पाकिस्तानला चारली धूळ; अंतिम फेरीत धडक

पुढारी ऑनलाईन डेस्क: आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने पाकिस्तानला धुळ चारत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताच्या पुरूष संघाने पाकिस्तानला ६१-१४ अशा गुणांनी पराभूत केले. यासह भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीतील चमकदार कामगिरीमुळे भारताचे आशियाई क्रिडा स्पर्धेतील आणखी एक पदक (सुवर्ण किंवा रौप्य) निश्चित झाले आहे. भारतीय संघाचा इराण किंवा चायनीज तैपेईविरुद्ध अंतिम सामना उद्या होणार आहे. (Asian Games 2023 Kabaddi)

संबंधित बातम्या:

आशियाई क्रीडा कबड्डी स्पर्धेत अत्यंत चुरशीच्या सामन्यात भारताने ६१-१४ फरकाने सामना आपल्या खिशात टाकत पदक निश्चित केले. यापूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाने उपांत्यपूर्व फेरीत चमकदार कामगिरी करत, उपांत्य फेरी गाठली होती. आज (दि.६) महिला संघाचा उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. (Asian Games 2023 Kabaddi)

आशियाई क्रिडा स्पर्धेच्या आज १३ व्या दिवशी कबड्डीत उपांत्य उपांत्य फेरीत सामना सुरू होताच पाकिस्तान संघाने दमदार सुरवात करत ४ गुण मिळवले. त्यानंतर भारताने जोरदार प्रत्युत्तर करत ७-४ असे गुण मिळवत आघाडी घेतली. परंतु पाकिस्तान खेळी करू शकला नाही. चमकदार कामगिरी करत भारताच्या संघाने गेममध्ये १५-५ अशी आघाडी कायम ठेवली. पाकिस्तानला बोनस पाॅइंट मिळणार असे वाटत होते पण बोनस पॉइंट मिळाला नाही. पाकिस्तानची संपूर्ण टीम अनेकवेळा बाद ठरल्याने, भारताचा संघ मजबूत दिसून आला. पाकिस्तानच्या संघाला कोणतीही हालचाल न करता आल्याने, २१-५ अशी आघाडी भारतीय संघाने कायम राखली.

भारतीय खेळाडून आक्रमक चढाई करत पाकिस्तानला नामोहरम केले. या सामन्यादरम्यान पाकिस्तान संघ पाचवेळा ऑलआउट झाला. दरम्यान भारतीय संघाने ५१-८ अशी भक्कम आघाडी कायम ठेवली. पुन्हा सहाव्यांदा भारतीय संघाने पाकिस्तानचा संघ ऑलआउट करत, भारतीय संघाने संपूर्ण सामन्यात ५९-१० गुणांसह चढाई कायम ठेवली. कबड्डीच्या अंतिम टप्प्यात भारतीय संघाने ६१-१४ अशा फरकाने पाकिस्तानचा पराभव करत आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

हेही वाचा:

Back to top button