Asian Games 2023 | तिरंदाजीत भारताला आणखी एक पदक, रिकर्व्हमध्ये महिला संघाला कांस्यपदक | पुढारी

Asian Games 2023 | तिरंदाजीत भारताला आणखी एक पदक, रिकर्व्हमध्ये महिला संघाला कांस्यपदक

पुढारी ऑनलाईन : भारताला तिरंदाजीत आणखी एक पदक मिळाले आहे. आज अंकिता भकत, भजन कौर आणि सिमरनजीत कौर या महिलांच्या त्रिकूटाने रिकर्व्ह प्रकारात कांस्यपदक जिंकले. त्यांनी व्हियतनाम महिलांच्या संघाला ६-२ असे हरवले. (Asian Games 2023)

याआधी रिकर्व्ह प्रकारात भारताच्या महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत जपानचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली होती. पण त्यांचा उपांत्य फेरीत कोरियाकडून ६-२ असा पराभव झाला होता. आशियाई क्रीडा स्पर्धेचा आजचा १३ वा दिवस आहे.

संबंधित बातम्या 

दरम्यान, कुस्तीपटू बजरंग पुनियाने त्याच्या पहिल्याच लढतीत फिलीपिन्सच्या रोनिल तुबोगचा १०-० ने पराभव केला.

काल गुरुवारी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या १२ व्या दिवशी भारताने तिरंदाजीत महिला कंपाऊंड सांघिकमध्ये सुवर्णदक जिंकले होते. ज्योती वेण्णम, आदिती स्वामी आणि प्रनीत कौर यांनी चायनीज तैपेईच्या महिला संघाला २३०-२२८ असे हरवत सुवर्ण कामगिरी केली होती.

त्यानंतर काल भारताने पुरूष कंपाऊंड संघाने सुवर्ण पदकाची कमाई केली होती. तिरंदाजीत महिला कंपाऊंड (सांघिक) पाठोपाठ पुरूष कंपाऊंड (सांघिक) गटाने देखील सुवर्णवेध कामगिरी करत पदक मिळवले होते. भारताच्या ओजस, अभिषेक आणि प्रथमेश या त्रिकुटाने पुरुषांच्या तिरंदाजी कंपाऊंड स्पर्धेत कोरियाचा पराभव करत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली होती. (Archary Asian Games 2023)

त्याआधी तिरंदाजीच्या कंपाऊंड मिश्र सांघिकमध्ये भारताच्या ओजस देवतळे आणि ज्योती वेण्णम यांनी सुवर्णपदक जिंकले होते. त्यांनी अंतिम फेरीत सो चावोन आणि जू जाहून या कोरियन जोडीला १५९-१५८ असे हरवत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती.

Back to top button