Asian Games 2023 Hockey | हॉकीत भारतीय महिलांचा धडाका कायम, हाँगकाँगवर १३-० ने मात, उपांत्य फेरीत प्रवेश | पुढारी

Asian Games 2023 Hockey | हॉकीत भारतीय महिलांचा धडाका कायम, हाँगकाँगवर १३-० ने मात, उपांत्य फेरीत प्रवेश

पुढारी ऑनलाईन : भारतीय महिला हॉकी संघाने मंगळवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत पूल ए मधील अंतिम सामन्यात हाँगकाँग चीनचा १३-० ने पराभव केला. भारतीय महिला हॉकी संघासाठी दीप ग्रेस एक्का, वंदना कटारिया आणि दीपिका यांनी हॅटट्रिक केली. भारतीय संघाचा सामना आता उपांत्य फेरीत पूल बी मधील उपविजेत्या संघाशी होईल. (Asian Games 2023 Hockey)

संबंधित बातम्या

पूल ए मधील अंतिम सामन्यातील विजयाने भारतीय महिला हॉकी संघ चार सामन्यांतून १० गुणांसह पूल ए मध्ये अव्वल स्थानावर आहे. प्रत्येक पूलमधील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. गुरुवारी उपांत्य फेरीत भारताचा सामना बी पूलमधील उपविजेत्या संघाशी होईल.

गेल्या आठवड्यात सिंगापूरचा १३-0 आणि मलेशियाचा ६-० असा पराभव केला होता. तर भारताने रविवारी झालेल्या सामन्यात कोरियाशी १-१ अशी बरोबरी साधली होती.

महिलांच्या आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (एफआयएच) क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाने सुरुवातीपासूनच हाँगकाँगवर वर्चस्व राखले. हा सामना सुरु होताच काही मिनिटातच वंदना कटारियाने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. दीपिका, मोनिका आणि दीप ग्रेस एक्का यांनी गोल करून पहिला क्वार्टर संपण्यापूर्वी ४-० ने आघाडी घेतली.

भारताने दुसऱ्या क्वार्टरमध्ये वर्चस्व कायम ठेवले. वंदना कटारियाने केलेल्या मैदानी गोलमुळे भारताला ५-० अशी आघाडी घेतली. भारतीय महिला हॉकी संघाने प्रतिस्पर्धी संघाचा बचाव भेदत आक्रमण कायम ठेवले आणि संगीता कुमारीने गोल करून ६-० ने आघाडी मिळवून दिली.

पहिल्या हाफनंतर भारताने हाँगकाँगवर दबाव कायम ठेवला आणि संगीता कुमारी आणि नवनीत कौर यांनी अखेरच्या दोन क्वार्टरमध्ये आणखी गोलची भर घातली.

दीप ग्रेस एक्का, वंदना कटारिया आणि दीपिका यांनाही हॅट्ट्रिक केली. यामुळे भारतीय महिला हॉकी संघाची आशियाई क्रीडा २०२३ मध्ये आपली अपराजित राहण्याची कामगिरी कायम ठेवली.

हे ही वाचा :

Back to top button