Asian Games 2023: ओजस, अभिषेकचा अचूक वेध; तिरंदाजीत सुवर्ण, रौप्य निश्चित

Asian Games 2023
Asian Games 2023

पुढारी ऑनलाईन: एशियन गेम्स,२०२३ मध्ये तिरंदाजी क्रिडा प्रकारात भारताने सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्ही पदके निश्चिती केली आहे. ओजस देवतळे याने दमदार कामगिरी करत फायनल राऊंडमध्ये धडक मारली आहे. भारताच्या अभिषेक वर्माने देखील फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे एशियन गेम्समध्ये तिरंदाजीत भारत विरूद्ध भारत असा सामना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे एशियन गेम्समध्ये भारतासाठी तिरंदाजीतील सुवर्ण किंवा रौप्य अशी दोन्ही पदके निश्चित झाली आहेत. (Asian Games 2023)

ओजसने अचूक नेमाचा वेध घेत कोरियाच्या माजी वर्ल्ड चॅम्पियन यांग जावॉनला १५०-१४६ गुणांनी मात देत अंतिम सामन्यात प्रवेश केला. तर अभिषेकने सेमीफायनलमध्ये कोरियन तिरंदाज जाहून जूचा १४७-१४५ असा पराभव करत अंतिम फायनलमध्ये प्रवेश केला. तिरंदाजीत भारत विरूद्ध भारत असा सामना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे भारताचे तिरंदाजी क्रिडा प्रकारातील सुवर्ण आणि रौप्य ही दोन्ही पदके निश्चित झाली आहेत. (Asian Games 2023)

एशियन गेम्स, २०२३ मधीलतिरंदाजीतीलसुवर्णपदकासाठीची अंतिम लढत शनिवारी (दि.७) होणार आहे. (Asian Games 2023)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news