ICC ODI Rankings मध्ये शुभमन गिलचे नंबर १ स्थान थोडक्यात हुकले, बाबर आझमचे स्थान धोक्यात | पुढारी

ICC ODI Rankings मध्ये शुभमन गिलचे नंबर १ स्थान थोडक्यात हुकले, बाबर आझमचे स्थान धोक्यात

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी विश्वचषक २०२३ (ICC World Cup 2023) सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. भारतात ५ ऑक्टोबरपासून क्रिकेटचा महाकुंभ सुरू होत आहे. आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत (ICC ODI Ranking) अव्वल क्रमांकाचा फलंदाज म्हणून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची (Babar Azam) आयसीसी विश्वचषक २०२३ मध्ये एंट्री निश्चित आहे. नवीन जाहीर केलेल्या या क्रमवारीत बाबर अव्वल स्थानावर आहे. तर भारताचा सलामीवीर शुभमन गिल (Shubaman Gill) याचे स्थान जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा फलंदाज होण्यापासून थोडक्यात हुकले आहे. (Shubaman Gill vs Babar Azam)

संबंधित बातम्या : 

बाबर आझमच्या खात्यात ८५७ रेटिंग गुण आहेत, तर शुभमन गिलच्या खात्यात ८४७ रेटिंग गुण आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात गिलने शतक झळकावले. त्यानंतर त्याने क्रमांक १ च्या दिशेने आगेकूच केली. गिल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या एकदिवसीय सामन्यात खेळणार नाही, त्यामुळे त्याला विश्वचषकातील नंबर-१ (ICC ODI Ranking) चा फलंदाज बनणे अशक्य आहे. शुभमनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये ७४ आणि १०४ धावा केल्या होत्या. जर त्याने आणखी २२ धावा केल्या असत्या तर त्याने बाबर आझमला मागे टाकले असते. (Shubaman Gill vs Babar Azam)

शुभमन गिल भारतासाठी टी-२०, कसोटी आणि वनडे हे तिन्ही फॉरमॅट खेळतो. विराट कोहलीचा उत्तराधिकारी म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जाते. शुभमन गिल अजून जगातील नंबर वन बॅट्समन बनला नसला तरी तो त्याच्या खूप जवळ आहे. गिलच्या कारकिर्दीतील हे सर्वोत्तम रँकिंग (ICC ODI Ranking) आहे आणि तो ज्याप्रकारे फॉर्ममध्ये आहे, त्यावरून तो विश्वचषकादरम्यान निश्चितपणे नंबर-१ स्थान मिळवेल, असे दिसते. दक्षिण आफ्रिकेचा रॅसी व्हॅन डर डुसेन आयसीसी क्रमवारीत शुबमन गिलपेक्षा ७४३ रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर चौथ्या स्थानावर आयर्लंडचा हॅरी टेक्टर ७२९ रेटिंग गुणांसह आहे. टॉप-१० मध्ये विराट कोहली ९ व्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमधून विराटला विश्रांती देण्यात आली होती. तर कर्णधार रोहित शर्मालाही आशिया कप २०२३ नंतर या दोन सामन्यांमधून ब्रेक मिळाला आहे. रोहित सध्या ११ व्या स्थानावर आहे. याशिवाय, आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतील टॉप-१० मध्ये कोणतेही महत्त्वाचे बदल झालेले नाहीत.

श्रेयस अय्यरने आठ स्थानांची प्रगती केली असून तो ३० व्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर केएल राहुलनेही सहा स्थानांची प्रगती करत ३३ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. मोहम्मद सिराज नंबर-१ वनडे गोलंदाज कायम आहे, तर कुलदीप यादव १० व्या स्थानावर आहे. भारताच्या या दोन गोलंदाजांचा टॉप-१० मध्ये समावेश असून मोहम्मद शमी २५ व्या स्थानावर आहे.

हेही वाचा : 

Back to top button