Rohit Sharma new Record : रोहित शर्माचे नवे रेकॉर्ड, बनला सर्वात जलद 550 षटकार मारणारा खेळाडू | पुढारी

Rohit Sharma new Record : रोहित शर्माचे नवे रेकॉर्ड, बनला सर्वात जलद 550 षटकार मारणारा खेळाडू

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma new Record : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात राजकोट येथे सुरू असलेल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने आपल्या नावावर एक खास विक्रम नोंदवला आहे. रोहित शर्मा कोणत्याही देशात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. रोहितचे भारतीय भूमीवर एकूण 258 षटकार झाले आहेत. हिटमॅनने भारतीय भूमीवर 258 षटकार मारले आहेत. या यादीत त्याने न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलला मागे टाकले आहे. ज्याने आपल्या स्वत:च्या देशात 256 आंतरराष्ट्रीय षटकार ठोकले होते.

राजकोट येथे सुरू असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारताला 353 धावांचे लक्ष्य दिले. यानंतर भारताने धावांचा पाठलाग करताना आक्रमक सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्माने आपले अर्धशतक 31 चेंडूत पूर्ण केले. पण शतकाने त्याला हुलकावणी दिली. 57 चेंडूत 81 धावांवर खेळताना त्याला मॅक्सवेलने कॉट अँड बोल्ड केले. रोहितने आपल्या धमाकेदार खेळीत 5 चौकारांसह 6 षटकार ठोकले. (Rohit Sharma new Record)

यासह तो कोणत्याही देशात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनायला रोहितला अवघ्या तीन षटकारांची गरज आहे. अगामी वर्ल्डकपमध्ये तो हा विक्रम नक्कीच आपल्या नावावर करेल यात शंका नाही. रोहितने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 550 षटकार पूर्ण केले आहेत. या यादीत रोहितच्या वर फक्त वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आहे. गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 553 षटकार मारले आहेत. दुसरीकडे, रोहित शर्मा अजूनही आपली खेळी कायम ठेवत असून काही वेळातच तो हा विक्रम मोडू शकतो.

रोहितचे 550 षटकार, ठरला जगातील दुसरा खेळाडू (Rohit Sharma new Record)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विध्वंसक फलंदाजांनी त्यांच्या षटकार मारण्याच्या क्षमतेनुसार खेळावर वर्चस्व गाजवले आहे. आज रोहितने आपल्या अर्धशतकी खेळीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 550 षटकार पूर्ण केले. ही कामगिरी करणारा रोहित जगातील दुसरा खेळाडू ठरला. त्याने सर्वात जलद 550 आंतरराष्ट्रीय षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. यासाठी त्याने केवळ 471 डाव खेळले. त्याच्याआधी केवळ ख्रिस गेलने अशी कामगिरी केली होती. पण त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये 544 डाव खेळून 550 षटकार पूर्ण केले होते. रोहितचे एकूण 551 आंतरराष्ट्रीय षटकार झाले आहेत. गेलला मागे टाकायला आता त्याला केवळ तीन षटकार ठोकावे लागणार आहेत.

Back to top button