पुढारी ऑनलाईन डेस्क : आशियाई क्रीडा २०२३ च्या स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी इतिहास रचला आहे. भारतीय नेमबाज अनंत जीत सिंग नारुका याने पुरुषांच्या स्कीट स्पर्धेत ६० पैकी ५८ गुणांसह रौप्यपदकावर मोहर उमटवली. अत्यंत चुरशीच्या अंतिम फेरीत अवघ्या दोन गुणांनी नरूकाचे सुवर्णपदक हूकले.
संबंधित बातम्या :
भारताच्या अनंत जीत सिंगने बुधवारी (दि.२७) आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये पुरुषांच्या शॉटगन स्कीट स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. कुवेतच्या ६० वर्षीय अब्दुल्ला अल-रशिदीने भारताच्या अंगद वीर सिंगने २०१८ मध्ये स्थापित केलेल्या जागतिक विक्रमाशी बरोबरी करत ६० गुणांसह सुवर्णपदक जिंकले. अनंतने ६० पैकी ५८ गुण मिळवले. नेमबाजीतील भारताचे हे ११ वे पदक आहे. त्याने नेमबाजीतील मागील आवृत्तीतील पदकतालिकेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे.
दरम्यान, आदल्या दिवशी, भारतीय पुरुषांच्या शॉटगन स्कीट संघाने ३५५ गुणांसह कांस्यपदक जिंकले. अनंतसह अंगद वीर सिंग आणि गुर्जोत सिंघ हे अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य जिंकणाऱ्या चीन आणि कतारच्या खाली होते.
ईशा सिंगला २५ मीटर नेमबाजीत रौप्यपदक
१८ वर्षीय ईशा सिंगने २५ मीटर वैयक्तिक नेमबाजी स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. तिने नेत्रदीपक कामगिरी करत आशियाई क्रिडा स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली. हांगझोऊ येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीतील भारताचे हे 11 वे पदक आहे. (Hangzhou 2023 Asian Games)
मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम संगवान यांनी बुधवारी (दि.२७) २५ मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. या तिघींनी २५ मीटर रॅपिड पिस्तुलमध्ये सुवर्णपदक जिंकले. यानंतर ईशा सिंग हिने २५ मीटर वैयक्तिक नेमबाजी स्पर्धेत रौप्यवेध घेतला आहे. ईशा सिंगने महिलांच्या 25 मीटर वैयक्तिक नेमबाजी स्पर्धेतील अंतिम फेरी 34 गुणांसह पूर्ण केली. तर चीनच्या लिऊ रुई हिने 38 गुणांसह सुवर्णपदकाची कमाई केली.
हेही वाचा :