Hangzhou 2022 Asian Games | ईशा सिंगला २५ मीटर नेमबाजीत रौप्यपदक | पुढारी

Hangzhou 2022 Asian Games | ईशा सिंगला २५ मीटर नेमबाजीत रौप्यपदक

पुढारी ऑनलाईन : १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताने आणखी एका रौप्यपदकाची कमाई केली. १८ वर्षीय ईशा सिंगने २५ मीटर वैयक्तिक नेमबाजी स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. तिने नेत्रदीपक कामगिरी करत आशियाई क्रिडा स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली. हांगझोऊ येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीतील भारताचे हे 11 वे पदक आहे. (Hangzhou 2022 Asian Games)

मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम संगवान यांनी बुधवारी (दि.२७) २५ मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. या तिघींनी २५ मीटर रॅपिड पिस्तुलमध्ये सुवर्णपदक जिंकले. यानंतर ईशा सिंग हिने २५ मीटर वैयक्तिक नेमबाजी स्पर्धेत रौप्यवेध घेतला आहे. ईशा सिंगने महिलांच्या 25 मीटर वैयक्तिक नेमबाजी स्पर्धेतील अंतिम फेरी 34 गुणांसह पूर्ण केली. तर चीनच्या लिऊ रुई हिने  38 गुणांसह सुवर्णपदकाची कमाई केली. (Hangzhou 2022 Asian Games)

ईशा सिंगचा जन्म 1 जानेवारी 2005 रोजी हैदराबाद येथे झाला. 2018 मध्ये 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात ती राष्ट्रीय चॅम्पियन बनली. यापूर्वी ईशा हिने 2019 मध्ये सुहल, जर्मनी येथे ज्युनियर विश्वचषक स्पर्धेत रौप्य पदक, वैयक्तिक आणि मिश्र सांघिक स्पर्धेत आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्णपदके जिंकली होती. (Hangzhou 2022 Asian Games)

हेही वाचा:

Back to top button