Asian Games 2023 | भारताचा नेमबाजीत दबदबा कायम, चौथ्या दिवशी सुवर्ण, रौप्यपदकाची कमाई

Asian Games 2023
Asian Games 2023
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने चौथ्या दिवशी नेमबाजीत दमदार सुरुवात केली. मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम संगवान यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने नेमबाजीत देशाचे वर्चस्व कायम ठेवत बुधवारी (दि.२७) चीनमधील हांगझो येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्याचबरोबर भारताच्या सिफ्ट कौर समरा, आशी चौकसे आणि मानिनी कौशिक यांनी ५० मीटर रायफल ३ पोझिशन सांघिक स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. (Asian Games 2023)

मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम संगवान
मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम संगवान

आज (दि.२७) भारतीय नेमबाज मनू भाकर, ईशा सिंग आणि रिद्दम संगवान यांनी २५ मीटर रॅपिड पिस्तुलमध्ये सुवर्णपदक जिंकले. तत्पूर्वी, भारतीय महिला संघ शिफ्ट कौर, मिनी कौशिक आणि आशी चौकसे यांनी ५० मीटर एअर रायफल ३ पोझिशनमध्ये रौप्यपदक जिंकले. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत १४ पदके जिंकली आहेत. ज्यामध्ये तीन सुवर्णपदक आहेत. (Asian Games 2023)

भारतीय संघाला एकूण १,७५९ गुण मिळाले, ज्यामुळे सुवर्णपदक निश्चित झाले. चीनने १,७५६ गुणांसह रौप्यपदक मिळवले. तर दक्षिण कोरियाला एकूण १,७४२ गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

मनू भाकरने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल स्पर्धेत ५९० गुणांसह पात्रता क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. ईशा सिंग ५८६ गुणांसह पाचव्या तर रिदम सांगवान ५८३ गुणांसह सातव्या स्थानावर राहिली. त्यांची एकत्रित गुणसंख्या चीनला ३ गुणांनी मागे टाकण्यासाठी पुरेसी ठरली.

मनू भाकरने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल स्पर्धेत ५९० गुणांसह पात्रता क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. ईशा सिंग ५८६ गुणांसह पाचव्या तर रिदम सांगवान ५८३ गुणांसह सातव्या स्थानावर राहिली. त्यांची एकत्रित गुणसंख्या चीनला ३ गुणांनी मागे टाकण्यासाठी पुरेसी ठरली. यासह भारताने नेमबाजीचे सातवे आणि एकूण चौथे सुवर्णपदक पटकावले आहे.

याआधी दिव्यांश सिंग पनवार, रुद्रांक्ष पाटील, ऐश्वरी प्रताप सिंह तोमर यांच्या संघाने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकावले होते. तसेच महिलांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये मेहुली घोष, रमिता जिंदाल आणि आशी चौकसे यांना सांघिक रौप्यपदक मिळाले.

संबधित बातम्या

चीनमधील हांगझोऊ येथे १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धा २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत होत आहेत. या कालावधीत ४० खेळांमध्ये एकूण ४८२ स्पर्धा होत आहेत. ज्यात १०,००० हून अधिक ४५ देशांतील खेळाडू सहभागी झाले आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज चौथा दिवस. सलग चौथ्या दिवशी भारतीय टीमने चांगली कामगिरी केली आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news