Smriti Mandhana : स्मृती मानधनाचे मुंबईत जल्लोषात स्वागत

Smriti Mandhana : स्मृती मानधनाचे मुंबईत जल्लोषात स्वागत

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय महिला क्रिकेट संघाने चीनमधील हाँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games) सुवर्णपदक जिंकल्यानंतर स्मृती मानधना (Smriti Mandhana) मंगळवारी रात्री चीनहून मायदेशी परतली. यावेळी तिचे मुंबईत जल्लोषात स्वागत करण्यात आले.

संबंधित बातम्या : 

आशियामध्ये महिला क्रिकेटमध्ये भारताने आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने प्रथमच आशियाई क्रीडा  स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. भारताचे हे या स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक ठरले. स्मृती मानधनाच्या दमदार फलंदाजीने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेचा १९ धावांनी पराभव करत सुवर्ण पदकावर मोहर उमटवली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news