ICC World Cup 2023 : विश्वचषकाची वर्ल्ड टूर अन् वाह ताज! | पुढारी

ICC World Cup 2023 : विश्वचषकाची वर्ल्ड टूर अन् वाह ताज!

आग्रा, वृत्तसंस्था : आगामी ‘आयसीसी’ वन-डे विश्वचषक (ICC World Cup 2023) स्पर्धेला आता जेमतेम 50 दिवसांचा कालावधी बाकी असून, या पार्श्वभूमीवर, विश्वचषकाची ‘वर्ल्ड टूर’ आता भारतात पोहोचली आहे. हा प्रतिष्ठेचा विश्वचषक ताज महलसमोर प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला. यंदाची ‘आयसीसी’ वन-डे विश्वचषक स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत भारतात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ‘आयसीसी’ वन-डे विश्वचषकाची प्रतिकृती विविध खंडांतून प्रदर्शनार्थ ठेवण्यात आली होती.

भारतातच होणार्‍या ‘आयसीसी’ वन-डे विश्वचषक (ICC World Cup 2023) स्पर्धेची तमाम क्रिकेट रसिकांना उत्सुकता असून, या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यात 5 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. भारतीय संघ आपल्या विश्वचषक मोहिमेला चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढतीने श्रीगणेशा करेल. ही लढत 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. स्पर्धेतील जेतेपदाचा फैसला 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमध्येच होणार आहे.

Back to top button