Rohit Sharma : हिटमॅन रोहितचा विराटला अप्रत्यक्ष टोमणा?, म्हणाला…. | पुढारी

Rohit Sharma : हिटमॅन रोहितचा विराटला अप्रत्यक्ष टोमणा?, म्हणाला....

दुबई : पुढारी ऑनलाईन

भारतीय संघाचा सेमीफायनल पर्यंत पोहोचण्याचा मार्ग खडतर आहे. टी २० वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) भारतीय संघाचा सामना आज शुक्रवारी स्कॉटलंडशी (India vs Scotland ) होणार आहे. या लढतीत भारतीय संघाचे लक्ष मोठा विजय मिळवण्यावर असणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा एक व्हिडिओ आयसीसीने (ICC) ने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहितने अनेक पैलूंवर मोकळेपणाने आपले मत व्यक्त केले आहे. हिटमॅन रोहितने म्हटले आहे की जोपर्यंत तुम्ही ट्रॉफी जिंकत नाही तोपर्यंत कितीही शतके आणि धावा करा पण त्याचा काही उपयोग नाही आणि त्यापुढे धावांची संख्या ही काही सर्वस्व नाही. तुम्हाला नेहमी संघाला स्वतःच्या पुढे ठेवावे लागेल.

वैयक्तिक कामगिरीपेक्षा टीमची कामगिरी महत्त्वाची आहे. २०१६ पासून आतापर्यंत मी खूप अनुभव घेतला आहे. मी फलंदाज म्हणून २०१६ च्या तुलनेत अधिक परिपक्व झालो आहे. ज्यावेळी तुम्ही सलामीवीर म्हणून टीमसाठी डावाची सुरुवात करता त्यावेळी तुमच्याकडे अधिक चेंडूंचा सामना करण्याची संधी असते. तुम्हाला जास्त धावा मिळतात. यामुळेच तुम्ही पाहू शकता की टी २० मध्ये जगभरात जेवढी शतके बनविली गेली आहेत ती वरच्या तीन फलंदाजांनी बनवली आहेत. माझे काम हेच आहे, असे रोहितने (Rohit Sharma) म्हटले आहे.

अफगाणिस्तान विरुद्धच्या लढतीत भारताने ६६ धावांनी विजय मिळवला होता. भारतीय संघ आपला हाच फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवण्यासोबत दुसर्‍या संघांच्या कामगिरीवरदेखील लक्ष ठेवावे लागणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पहिल्या दोन लढतीत पराभूत झाल्यानंतर भारताचा रन रेटदेखील खराब झाला आहे. भारतासाठी आता प्रत्येक लढत महत्त्वाची आहे. पाकिस्तान चार विजयांसह उपांत्यफेरीत पोहोचला आहे. तर, न्यूझीलंड संघदेखील तेथे पोहोचण्याची शक्यता अधिक आहे. न्यूझीलंड नामिबिया किंवा अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यास भारताच्या आशा जिवंत राहतील.

भारताची नजर मोठ्या फरकाने विजय मिळवण्यावर असतील. पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध अपयशी राहिल्यानंतर अफगाणिस्तान विरुद्ध भारताच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. रोहित शर्माने या लढतीत अर्धशतक झळकावत चमकदार कामगिरी केली. के. एल. राहुल, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या सर्वांनी अफगाणिस्तान संघाविरुद्ध धावा केल्या. सूर्यकुमार यादव संघात आल्याने फलंदाजी मजबूत झाली आहे.

हे ही वाचा :

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC T20 World Cup (@t20worldcup)

Back to top button