

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ मध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने झुरिच डायमंड लीगमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. गुरुवारी (दि.31) झालेल्या डायमंड लीग मीटिंगच्या पुरुष भालाफेक स्पर्धेत अंतिम फेरीत ८५.७१ मीटर फेक करून त्याने दुसरे स्थान पटकावले. त्याने जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या झेक प्रजासत्ताकच्या जेकब वडलेजच (85.86 मी) मागे टाकले आहे. (Neeraj Chopra)
डायमंड लीग मीटिंगच्या गुरुवारी (दि.१) झालेल्या पुरुष भालाफेक स्पर्धेत २५ वर्षीय चोप्रा अंतिम फेरीत ८५.७१ मीटर फेक करून दुसरे स्थान पटकावले. त्याने ८०.७९ मीटर, ८५.२२ मीटर आणि ८५.७१ मीटर असे तीन कायदेशीर थ्रो केले तर उर्वरित तीन फाऊल होते. त्याने दोहा (५ मे) आणि लॉसने (३० जून) येथे डायमंड लीग मीटिंग्ज जिंकल्या होत्या. रविवारी (दि.२७) बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत ८८.१७ मीटर फेक करून इतिहास घडवला. नीरज हा जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला. नीरज चोप्राच्या या कामगिरीबद्दल देशभरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पत्रकार परिषदेत नीरज चोप्राने बोलत असताना सांगितले की, जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याला खांद्यावर आणि पाठीत दुखत आहे. मे-जूनमध्ये प्रशिक्षण घेत असताना कंबरेच्या दुखण्यामुळे तो शोपीस कार्यक्रमादरम्यान १०० टक्के फिट नव्हता.
हेही वाचा