आता केवळ सात मिनिटांमध्‍ये सुरु होणार कॅन्सरवरील उपचार! इंग्‍लंडमधील ‘एनएचएस’ची इंजेक्‍शनला मंजुरी | पुढारी

आता केवळ सात मिनिटांमध्‍ये सुरु होणार कॅन्सरवरील उपचार! इंग्‍लंडमधील 'एनएचएस'ची इंजेक्‍शनला मंजुरी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंग्लंडमध्‍ये लवकरच कर्करोगाच्या ( कॅन्सर) झाल्‍याचे निदान झाल्‍यानंतर रुग्‍णांवर सात मिनिटांचा उपचार सुरू करण्‍याची सुविधा उपलब्‍ध होणार आहे. यासाठीचे इंजेक्शनला ब्रिटिशच्‍या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (एनएचएस) संस्‍थेने मान्यता दिली आहे. अशा प्रकारचे इंजेक्‍शन तयार करणारी ‘एनएचएस’ जगातील पहिली संस्‍था ठरणार आहे. या इंजेक्‍शनमुळे लवकर इंग्‍लंडबरोबर जगभरातील अन्‍य देशांमध्‍येही कॅन्‍सर रुग्‍णांवर लवकर उपचार सुरु होणे शक्‍य होणार आहे. ( Cancer Treatment )

Cancer Treatment : कमी वेळात उपलब्‍ध हाेणार उपचार

ब्रिटीश मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी संस्‍थेने (MHRA) ने याला मान्यता दिली आहे. मंजुरीनंतर, एनएचएस इंग्लंडने मंगळवारी सांगितले की, इम्युनोथेरपी, एटेझोलिझुमॅबवर उपचार घेत असलेल्या शेकडो रुग्णांना त्वचेखाली इंजेक्शन दिले जाईल. हे इंजेक्‍शन कर्करोगाच्या उपचारातील कालावधी कमी करेल, असा विश्‍वासही या संस्‍थेने व्‍यक्‍त केला आहे. यासंदर्भात माहिती देताना वेस्ट सफोक NHS फाउंडेशन ट्रस्टचे ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अलेक्झांडर मार्टिन म्हणाले की, “या इंजेक्‍शनला मंजुरीमुळे आम्हाला आमच्या रूग्णांची काळजी घेण्यास मदत होणार नाही. तसेच आमच्या टीमला दिवसभरात अधिक रूग्णांवर उपचार करण्यास देखील मदत होईल.

असे होणार कॅन्‍सर रुग्‍णांवर उपचार

इंग्लंडच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने अहवालात म्‍हटले आहे की, एटेझोलिझुमॅब ज्याला टेसेंट्रिक देखील म्हणतात. टेसेंट्रिक हा एक मोनोक्लोनल अँटीबॉडी आहे. तो कर्करोगाच्या रूग्णांमध्ये रोगप्रतिकारक शक्तीच्या कार्यपद्धतीवर परिणाम करतो. हे सहसा रूग्णांना त्यांच्या शिरामध्ये थेट ड्रिपद्वारे दिले जाते. जेव्हा शिरा ओळखणे कठीण होते तेव्हा त्रास होतो. अशा परिस्थितीत रुग्णांना थेट ड्रिपव्‍दारे देण्‍यासाठी सुमारे 30 मिनिटे किंवा एक तासाचा कालावधी लागतो.

प्रतिकार शक्‍ती वाढविणारे औषध

रोश प्रोडक्ट्स लिमिटेडचे ​​वैद्यकीय संचालक मारियस शॉल्झ यांनी म्‍हटले आहे की, इंजेक्‍शन थेट शिरामध्ये पाठवण्याच्या पद्धतीला पूर्वीच्या ३० ते ६० मिनिटांच्या तुलनेत आता सुमारे सात मिनिटे लागतात. एटेझोलिझुमब रोश (ROG.S) कंपनी जेनेन्टेकने बनवले आहे. हे एक इम्युनोथेरपी ( प्रतिकार शक्‍ती वाढविणारे ) औषध आहे, जे रुग्णाची स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि कर्करोगाच्या पेशी शोधून नष्ट करण्यास सक्षम बनवते. हे सध्या फुफ्फुस, स्तन आणि यकृत यासह विविध प्रकारचे कर्करोग असलेल्या NHS रूग्णांवर उपचार करत आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button