INDIA alliance Mumbai Meeting | सोनिया आणि राहुल गांधी ‘इंडिया’च्या बैठकीसाठी मुंबईत दाखल | पुढारी

INDIA alliance Mumbai Meeting | सोनिया आणि राहुल गांधी 'इंडिया'च्या बैठकीसाठी मुंबईत दाखल

पुढारी ऑनलाईन : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी विरोधी पक्ष आघाडीच्या तिसर्‍या बैठकीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. देशभरातील विरोधी पक्षाच्या इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्सची (इंडिया) अघाडीची आज (दि.३१) मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये बैठक होत आहे. यामध्ये देशभरातून २५ हून अधिक विरोधी पक्षाचे नेते (INDIA alliance Mumbai Meeting) सहभागी होत आहेत.

मुंबईत आज (दि.३१ ऑगस्ट) आणि उद्या शुक्रवारी (दि.१ सप्टेंबर) दोन दिवस INDIA आघाडीची बैठक होत आहे. मुंबईत होणाऱ्या बैठकीच्या नियोजनाचे यजमान पद हे उद्धव बाळाबाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे असणार आहे. दरम्यान हळूहळू विरोधी पक्षाचे नेते या बैठकीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळाबाहेर काँग्रेस समर्थकांनी गर्दी केली होती. याचा एक व्हिडिओ (INDIA alliance Mumbai Meeting) समोर आला आहे.

बिहारचे मुख्यमंत्री आणि JD(U) नेते नितीश कुमार भारत आघाडीच्या तिसऱ्या बैठकीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत. दरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे मुंबईतील तिसऱ्या भारत आघाडीच्या बैठकीच्या ठिकाणी आगमन झाले असल्याचे व्हिडिओ वृत्त एएनआयने दिलेे आहे.

यापूर्वी राष्ट्रीय जनता दलचे (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी त्यांचा मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह मुंबईतील सिद्धिविनायक गणपती मंदिरात पूजा केली असल्याचा व्हिडिओही समोर आला आहे.

हेही वाचा:

Back to top button