Ronaldo Watch Rajinikanth’s film Jailer : रोनाल्डोला रजनीकांतच्या अॅक्शनची भुरळ, गर्लफ्रेंड जॉर्जिनासोबत पाहिला ‘जेलर’ | पुढारी

Ronaldo Watch Rajinikanth's film Jailer : रोनाल्डोला रजनीकांतच्या अॅक्शनची भुरळ, गर्लफ्रेंड जॉर्जिनासोबत पाहिला ‘जेलर’

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ronaldo Watch Rajinikanth’s film Jailer : पोर्तुगालचा फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो तमिळ सुपरस्टार रजनीकांतचा चाहता बनला आहे. त्याने आपल्या कुटुंबासोबत दुबईमध्ये थलाइवा रजनीचा नुकताच रिलीज झालेला ‘जेलर’ हा सिनेमा पाहिला. याबाबत The CR7 Timeline या ट्विटर अकाऊंटवरून माहिती देण्यात आली आहे. (Ronaldo Watch Rajinikanth movie)

भारतीय दिग्गज अभिनेते रजनीकांत यांचा जेलर हा सिनेमा जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे की, पोर्तुगालचा फुटबॉल स्टार रोनाल्डोने रजनीकांतच्या या सिनेमाचा आनंद लुटला. (Ronaldo Watch Rajinikanth movie)

रोनाल्डोने दुबईतील एका सिनेमागृहाजवळ आपल्या कुटुंबासोबत फोटाकाडून सोशल मीडियावर शेयर केला आहे. रजनीकांत यांचा ‘जेलर’ सिनेमा भारतासह जगभरात चांगली कमाई करत आहे. रोनाल्डोचे फोटो व्हायरल होण्यापूर्वी राजकीय नेते एमके स्टॅलिन आणि पिनाराई विजयन यांचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यात ते सिनेमाचा आनंद लुटताना दिसत होते. रजनीकांतच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून चित्रपटाने कोटींहून अधिक कमाई केली आहे. रिलीजच्या अवघ्या सात दिवसांत या चित्रपटाने ४५० कोटींची कमाई केली आहे. (Ronaldo Watch Rajinikanth’s film Jailer)

 

View this post on Instagram

 

A post shared by Cristiano Ronaldo (@cristiano)

हेही वाचा;

Back to top button