Vasundhara Raje : राजस्थानात भाजपची मोठी घोषणा, पक्षाने दिला वसुंधरा राजेंना धक्का! | पुढारी

Vasundhara Raje : राजस्थानात भाजपची मोठी घोषणा, पक्षाने दिला वसुंधरा राजेंना धक्का!

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राजस्थानमधील अगामी विधानसभा निवडणुकीच्या (rajasthan election) पार्श्वभूमीवर भाजपने (Rajasthan BJP) मोठी घोषणा केली आहे. पण या घोषणेने माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (vasundhara raje) यांना मोठा झटका बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपने गुरुवारी राज्य निवडणूक व्यवस्थापन समिती आणि संकल्प (जाहिरनामा) समिती जाहीर केली. या दोन्ही समित्यांमध्ये वसुंधरा राजे यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही.

भाजपने (BJP) राजस्थान विधानसभा निवडणूक (rajasthan assembly election ) व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी नारायण पंचारिया यांची निवड केली असून केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल हे राज्य भाजपच्या संकल्प समितीचे (जाहिरनामा) निमंत्रक असतील. या समितीमध्ये किरोरीलाल मीना हे सहसंयोजक असतील. लाका गुर्जर, राव राजेंद्र सिंह, सुभाष मौर्य, प्रभुलाल सैनी, राखी राठौर यांना सहसंयोजक करण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सूचनेवरून प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांनी या समित्यांची घोषणा केली.

राजस्थानमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. मात्र, या दोन्ही महत्त्वाच्या समित्यांमध्ये माजी मुख्यमंत्री राजे यांना न ठेवल्याने पक्षाने सर्वांनाच चकित केले आहे. राजेंच्या भूमिकेबाबत पक्षाचे प्रदेश प्रभारी अरुण सिंह यांना विचारले असता, ‘इतर सर्व ज्येष्ठ नेते प्रचार करतील. पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून पक्ष सर्वांना जबाबदारी देईल,’ अशी प्रतिक्रिया दिली. विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार राज्यात पक्षाची अद्याप प्रचार समिती स्थापन झालेली नसून त्यात राजे यांचे नाव येते की नाही हे पाहावे लागेल.

Back to top button