INS Vindhyagiri : विंध्यागिरी युद्धनौका लॉन्च; नौदलात होणार लवकरच सामील | पुढारी

INS Vindhyagiri : विंध्यागिरी युद्धनौका लॉन्च; नौदलात होणार लवकरच सामील

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज (दि. १७) भारतीय नौदलाची अत्याधुनिक युद्धनौका “विंध्यागिरी” लॉन्च करण्यात आली. गार्डनरीच शिपबिल्डर्स इंजिनियरिंग लिमिटेड येथे हा कार्यक्रम पार पडला. (INS Vindhyagiri)

विंध्यागिरी अत्याधुनिक युद्धनौका नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. भारतीय नौदलाकडे कमिशनिंगसाठी पाठवण्यापूर्वी या युद्धनौकेची पुन्हा एकदा चाचणी केली जाईल. त्यानंतर नौदलामध्ये या नौकेचा समावेश होईल. राष्ट्रपती मुर्मू या INS विंध्यागिरीच्या (Vindhyagiri) प्रक्षेपणप्रसंगी बोलताना म्हणाल्या, “(INS) विंध्यगिरी हे भारताच्या सागरी क्षमता वाढविण्याच्या दिशेने वाटचाल करेल.”

निलगिरी क्लास फ्रिगेट्स माझगाव डॉक आणि गार्डन रीच शिपबिल्डर्स आणि इंजिनीअर्स यांच्यावर या युद्धनौकेची जबाबदारी आहे. एकूण सात युद्धनौका बांधण्यात येणार होत्या. यापैकी पाच लाँच युद्धनौका करण्यात आलेल्या आहेत. निलगिरी, उदयगिरी, तारागिरी, हिमगिरी आणि दुनागिरी अशी या फ्रिगेट्सची नावे आहेत.

हेही वाचा

 

Back to top button