सलग दुसर्‍या पराभवाने कर्णधार हार्दिक भडकला, यांना ठरवले 'व्‍हिलन' | पुढारी

सलग दुसर्‍या पराभवाने कर्णधार हार्दिक भडकला, यांना ठरवले 'व्‍हिलन'

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दुसऱ्या T20 मध्ये वेस्ट इंडिजने रविवारी (दि. ७) भारताचा दोन विकेट्सनी पराभव केला. या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) याने आपले मत स्‍पष्‍ट मांडले. सलग दुसरा सामना कोणत्‍या कारणामुळे गमावला हेही त्‍याने सामना संपल्‍यानंतर सांगितले. ( IND vs WI T-20)

IND vs WI T-20 : १६०-१७० धावा एक मोठे लक्ष्य ठरले असते

सामन्‍यानंतर बोलताना हार्दिक म्‍हणाला की, दुसर्‍या टी-20 सामन्‍यात आमची फलंदाजी चांगली झाली नाही. फलंदाजांच्‍या कामगिरीमुळे आम्‍हाला पराभवाला सामोरे जावे लागले. १६०-१७० धावा हे वेस्‍ट इंडिजसमाेर एक मोठे लक्ष्य ठरले असते. फलंदाजांना अधिक जबाबदारी घेण्याची गरज आहे, असेही त्‍याने स्‍पष्‍ट केले.

दुसर्‍या टी-२० सामन्‍यात तिलक वार्माने अर्धशतकी खेळी केली. भारताने प्रथम फलंदाजी करताना सात विकेट गमावत १५२ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्‍ट इंडिजच्‍या निकोलस पूरनने ४० चेंडूत ६७ धावा करत संघाच्या विजयाचा पाया रचला, वेस्ट इंडिजने २० षटकांत आठ गडी गमावत लक्ष्य गाठले. युजवेंद्र चहलने १६ व्‍या षटकामध्‍ये दोन विकेट घेत भारताच्‍या विजयाच्‍या आशा जिवंत ठेवल्‍या. मात्र अल्झारी जोसेफ आणि अकील हुसेन यांनी २६ धावांच्‍या भागीदारीमुळे वेस्‍ट इंडिजने दोन गडी राखत पाच सामन्‍यांच्‍या मालिकेत सलग दुसरा विजय नोंदवला.

हेही वाचा : 

 

 

Back to top button