कसोटी क्रिकेटमध्ये धावांच्या फरकाने सर्वात मोठा विजय इंग्लंडच्या नावावर आहे. 

1928 साली इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 675 धावांनी पराभव केला होता.

कसोटीच्या इतिहासातील हा विक्रम 93 वर्षांपासून अबाधित आहे. 

ऑस्ट्रेलियाने त्या पराभवाचा बदला 1934 मध्ये घेतला.

त्यावेळी ऑस्ट्रेलियाने इंग्लिश संघाला 562 धावांच्या मोठ्या फरकाने मात दिली होती.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे.

17 जून 2023 रोजी बांगलादेशने अफगाणिस्तानचा 546 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा तिसरा सर्वात मोठा विजय ठरला.

1911 मध्ये ऑस्ट्रेलियाने द. आफ्रिकेचा 530 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा चौथा सर्वात मोठा विजय आहे.

2018 मध्ये द. आफ्रिकेने 1911 च्या पराभवाचा बदला घेत कसोटी इतिहासातील 5 वा मोठा विजय नोंदवला.

त्या सामन्यात द. आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर 492 धावांनी दणदणीत विजय मिळवला.