Herschel Gibbs : ४९ व्या वर्षी हर्शल गिब्ज दुसर्‍यांदा चढणार बोहल्यावर | पुढारी

Herschel Gibbs : ४९ व्या वर्षी हर्शल गिब्ज दुसर्‍यांदा चढणार बोहल्यावर

दक्षिण आफ्रिकेचा माजी तडाखेबंद फलंदाज हर्शल गिब्ज त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे चर्चेत असायचा; पण वयाच्या ४९ व्या वर्षी त्याने आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे. गिब्जने गेल्या महिन्यात त्याची जवळची मैत्रीण डॅना नेमेथशी एंगेजमेंट केली. या जोडप्याने एंगेजमेंटचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

गिब्जने नेमेथला रोमँटिक प्रपोजलसोबत मनातील गोष्ट सांगितली. फोटोंमध्ये गिब्ज आणि नेमेथ खूप आनंदी दिसत होते. हर्शल गिब्जने यापूर्वी २००७ मध्ये लग्न केले होते. त्यांनी सेंट किटस् बेटावरील तेनिली पवईशी लग्न केले. हे लग्न फार काळ टिकले नाही. दोघांचा लवकरच घटस्फोट झाला. यानंतर गिब्ज अनेक वादात राहिला. फिक्सिंगपासून ते मद्यधुंद अवस्थेत फलंदाजीपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी तो चर्चेत होता.

हेही वाचा :

Back to top button