IND vs BAN T20 : भारताचा बांगलादेशवर शानदार विजय

IND vs BAN T20 : भारताचा बांगलादेशवर शानदार विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय महिला संघाने बांगलादेशविरूध्दच्या टी-२० सामन्यात ७ गडी राखून भारताने शानदार विजय मिळवला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने भारताला ११४ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने ७ विकेट गमवत हे आव्हान १६.२ षटकांमध्ये पार केले. (IND vs BAN T20) पहिल्‍या सामन्‍यात विजय मिळवत तीन सामन्‍यांच्‍या मालिकेत टीम इंडियाने आघाडी घेतली आहे.

कर्णधार हरमनप्रीत कौरची अर्धशतकी खेळी

बांगलादेश दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाबाद अर्धशतकी खेळी केली. तिने आपल्या खेळीत ३५ बॉलमध्ये ५४ धावांची खेळी केली. तिच्यासह स्मृती मानधानने ३४ बॉलमध्ये ३८ धावांचे योगदान दिले. तर जेमिना रॉड्रिक्सने ११ आणि यास्तिाका भाटियाने ९ धावांची खेळी केली. भारताची सलामीवीर शेफाली वर्माला खातेही उघडता आले नाही. गोलंदाजीमध्ये बांगलादेशच्या सुलतान खतुनने सर्वाधिक २ विकेट घेतल्या तर, मरूफा अख्तरने १ विकेट घेतली. (IND vs BAN T20)

तत्पूर्वी, सामन्यात टॉस जिंकून भारतीय संघाने यजमानांना फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण दिले. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने २० ओव्हरमध्ये ५ विकेट गमावून ११४ धावा केल्या. यामध्ये शो र्ना अख्तरने सर्वाधिक २८ धावांची खेळी केली. तिच्यासह शोभना मोस्तारी (२३), शस्ती राणी (२२), शमिमा सुलतान (१७), रितू मोनी (११) आणि निगर सुलतानने दोन धावांचे योगदान दिले. तर नहिदा अख्तर खाताने उघडताच तंबूत परतली. गोलंदाजीमध्ये भारताची गोलंदाजपूजा वस्त्राकार, मिनू मनी आणि शेफाली वर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news