Pak drone 'seize' : पंजाब सीमेजवळ बीएसएफ जवानांकडून सलग दुसऱ्या दिवशीही 'पाक ड्रोन' जप्त | पुढारी

Pak drone 'seize' : पंजाब सीमेजवळ बीएसएफ जवानांकडून सलग दुसऱ्या दिवशीही 'पाक ड्रोन' जप्त

पुढारी ऑनलाइन डेस्क : Pak drone ‘seize’ : भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेजवळ बीएसएफ (सीमा सुरक्षा दल) आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त पथकाने आज सलग दुसऱ्या दिवशीही एक पाकिस्तानी ड्रोन जप्त केला आहे. हा ड्रोन अमृतसर जिल्ह्यातील कक्कर गावाजवळ आज रविवारी सकाळी जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बीएसएफच्या जवानांनी काल शनिवारी देखील पंजाबच्या तरनतारन येथून पाकिस्तानचा एक ड्रोन जप्त केला होता. त्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी आणखी एक ड्रोन जप्त करण्यात आला आहे.

बीएसएफ आणि पंजाब पोलिसांनी विशिष्ट माहितीवरून सुरू केलेल्या शोध मोहिमेनंतर अमृतसरमधील कक्कर गावाच्या बाहेरून ड्रोन जप्त करण्यात आले. Pak drone ‘seize’

शोधादरम्यान, बीएसएफने सांगितले की, त्यांच्या जवानांनी पोलिस कर्मचार्‍यांसह कक्कर गावाला लागून असलेल्या शेतातून एक ड्रोन जप्त केला. “जप्त केलेले ड्रोन हे एकत्रित क्वाडकॉप्टर आहे,” बीएसएफने सांगितले, “बीएसएफ आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांनी आणखी एक पाकिस्तानी ड्रोन जप्त करण्यात आला.”

Pak drone ‘seize’ : पंजाबच्या तरनतारन येथून पाक ड्रोन जप्त

याआधी पाकिस्तानने शुक्रवारी रात्री पाठविलेल्या ड्रोनला बीएसएफच्या जवानांनी शुक्रवारी रात्री 9.05 वाजता पल्लोपती गावाजवळ रोखले होते. तसेच बीएसएफच्या जवानांनी तात्काळ ड्रोनला अडवण्याची प्रतिक्रिया दिली होती. नंतर शनिवारी पंजाबच्या भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेजवळ तरनतारन येथील पल्लोपती गावाजवळ पाकिस्तानने पाठवलेल्या या ड्रोनला जप्त करण्यात आले होते. हा ड्रोन DJI Matrice 350 RTK मालिकेतील आहेत.

हे ही वाचा :

प.बंगालमध्‍ये मतदानावेळी हिंसाचाराचा भडका का उडाला? : ‘बीएसएफ’ने केला माेठा खुलासा

Pakistani Drone Shot : अमृतसर आंतरराष्ट्रीय सीमेजवळ अंमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या पाकिस्तानी ड्रोनला बीएसएफने पाडले

Back to top button