बंगळूर; वृत्तसंस्था : सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने सुनील छेत्रीच्या गोलच्या जोरावर कुवेतवर जवळपास विजय मिळवलाच होता; परंतु भारताच्याच अन्वर अलीकडून सामना संपता संपता झालेल्या स्वयंगोलमुळे भारताच्या विजयावर पाणी पडले. हा सामना पूर्ण वेळेत 1-1 असा बरोबरीत राहिला. त्यामुळे गटात अव्वल स्थान मिळवण्याचे भारताचे स्वप्न भंगले. (SAFF Championship)
येथील क्रांतिरवा स्टेडियमवर अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताचा कर्णधार सुनील छेत्री याने (45+2 मिनिटे) आपला 92 वा आंतरराष्ट्रीय गोल नोंदवताना भारताला पूर्वार्धात 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. (SAFF Championship)
या आघाडीमुळे जोशात आलेल्या भारतीय संघाने जोमाने खेळ केला. यावेळी कुवेतच्या खेळाडूंशी हुज्जतही घातली गेली. यात 90 व्या मिनिटाला झालेल्या राड्यामुळे भारताच्या रहिम अली आणि कुवेतच्या अहमद अल कलाफ यांना रेड कार्ड मिळाले. सामन्याच्या 90+2 मिनिटाला भारताच्या अन्वर अलीने सेल्फ गोल केला. त्यामुळे कुवेतला बरोबरी साधता आली. शेवटी याच गोलसंख्येवर सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. भारत आधीच सेमीफायनलमध्ये पोहोचला असल्याने या निकालाचा तसा त्यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही.
हेही वाचा;