मॉस्को; वृत्तसंस्था : रशियातील बंडखोर वॅगनर खासगी लष्कर समूहाचे प्रमुख येवगिनी प्रिगोझीन यांनी रोस्तोव्ह शहरानंतर मॉस्कोपासून सुमारे 500 कि.मी.वरील वोरोनेझ शहरातील अण्वस्त्रसाठाही ताब्यात घेतला होता. त्यामुळेच रशियन सरकारी सैन्य बचावात्मक पवित्र्यात आले आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना सहमती द्यावी लागली. नंतर पुतीन यांच्या सांगण्यावरूनच बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी प्रिगोझीन यांना वाटाघाटीस तयार केले, असे वृत्त आता समोर आले आहे. (Russia – Ukraine War)
प्रिगोझीन यांना मॉस्कोला जायचेच नव्हते, मॉस्कोच्या दिशेने सुरू केलेली कूच अर्ध्यावर सोडून व्होरोनेझमधील आण्विकसाठ्याच्या दिशेने त्यांनी मोर्चा वळविला आणि आपली मोहीम संपविली. या अण्वस्त्रसाठ्याचा वापर प्रिगोझीन यांनी स्वत:च्या सुरक्षिततेची हमी म्हणून केला. पुतीन यांना ती द्यावी लागली आणि प्रिगोझीन सुरक्षितपणे बेलारूसला पोहोचू शकले. (रशियात देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊनही) (Russia – Ukraine War)
प्रिगोझीन जर रशियाच्या अण्वस्त्रसाठ्यापर्यंत पोहोचू शकतात, तर चेचेन नेते रमजान कादिरोव्हही हे कृत्य करू शकतात आणि तसे घडल्यास अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हातात पडू शकतात व जगाला धोका होऊ शकतो, अशी भीती आता आंतरराष्ट्रीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. रमजान हे सध्या पुतीन यांचे मित्र व समर्थक आहेत. प्रिगोझीन यांनी रोस्तोव्ह शहर ताब्यात घेतल्यानंतर रमजान यांनीच प्रिगोझीन यांच्याविरोधात रोस्तोव्हमध्ये आपले सैन्य पाठविले होते.
अधिक वाचा :