Ashes 2023 : इंग्लंडला फक्त 7 धावांची आघाडी; ऑस्ट्रेलिया प. डावात 386 धावा

Ashes 2023 : इंग्लंडला फक्त 7 धावांची आघाडी; ऑस्ट्रेलिया प. डावात 386 धावा
Published on
Updated on

बर्मिंगहॅम; वृत्तसंस्था : अ‍ॅशेस क्रिकेट कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने आपला पहिला डाव 393 धावांवर घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने त्याला प्रत्युत्तर देताना सुरुवातीच्या पडझडीनंतर उस्मान ख्वाजाच्या शतकाच्या जोरावर दुसर्‍या दिवसअखेरीस 5 बाद 311 अशी समाधानकारक मजल मारली होती, त्यामुळे तिसर्‍या दिवशी ऑस्ट्रेलिया आघाडी घेईल असे वाटत असतानाच इंग्लंडच्या गोलंदाजांनी पहिल्या सत्रात कमबॅक करीत ऑस्ट्रेलियाचा डाव 386 धावांत रोखला. त्यामुळे इंग्लंडला 7 धावांची आघाडी मिळाली. (Ashes 2023)

उस्मान ख्वाजाने दुसर्‍या दिवशी दिवसभर फलंदाजी करून नाबाद 126 धावा फटकावल्या होत्या. त्याच्या सोबत अ‍ॅलेक्स कॅरी मैदानावर 52 धावांवर नाबाद होता. तिसर्‍या दिवशी सकाळी सामन्याचे चित्र पालटले. कालच्या धावसंख्येत 14 धावांची भर घालून अ‍ॅलेक्स केरी तंबूत परतला. अँडरसनच्या इनस्विंगरने केरीच्या दांड्या कधी उडवल्या हे त्याला कळले नाही. यानंतर शतकवीर उस्मान ख्वाजाही (141) बाद झाला. ओली रॉबिनसनने त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. यानंतर तळाच्या फळीने फारसा प्रतिकार केला नाही. रॉबिनसन आणि ब्रॉडने ऑस्ट्रेलियाचा डाव 386 धावांवर संपवला. (Ashes 2023)

तत्पूर्वी, दुसर्‍या दिवशी ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. 11 व्या षटकात ब्रॉडच्या गोलंदाजीवर डेव्हिड वॉर्नर ड्राईव्ह मारायला गेला; परंतु चेंडूने बॅटची आतली किनार घेत यष्टींवर जाऊन आदळला. ब्रॉडने 15 वेळा वॉर्नरची विकेट मिळवली. पुढील चेंडूवर कसोटी क्रिकेटमधील नंबर वन फलंदाज मार्नस लॅबुशेन बाद झाला. यष्टींमागे बेअरस्टोने अफलातून झेल घेतला. ऑस्ट्रेलियाचे दोन फलंदाज 29 धावांत माघारी परतले. उस्मान ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथ यांनी डाव सावरला; परंतु स्मिथ 16 धावांवर बाद झाला.

ख्वाजा आणि हेड यांनी 81 धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला सावरले. भारताविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये शतक ठोकणार्‍या हेडने येथे अर्धशतक पूर्ण केले, पण त्यानंतर तो लगेच बाद झाला. मोईन अलीने त्याला 50 धावांवर बाद केले. अलीनेच ग्रीनला 38 धावांवर तंबूत पाठवले; परंतु यानंतर आलेल्या अ‍ॅलेक्स कॅरीने ख्वाजाची साथ सोडली नाही.

हेही वाचा; 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news