World Athletics Championships : एस. मुरलीला वर्ल्ड चॅम्पियनशिपचे तिकीट | पुढारी

World Athletics Championships : एस. मुरलीला वर्ल्ड चॅम्पियनशिपचे तिकीट

भुवनेश्वर; वृत्तसंस्था : येथे सुरू असलेल्या वरिष्ठ राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत भारताचा लांब उडीपटू मुरली श्रीशंकरने (एस. मुरली) 8.41 मीटर लांब उडी मारली. त्याची ही उडी आगामी बुडापेस्ट वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी पात्रता तिकीट मिळवून देणारी ठरली. कलिंगा स्टेडियमवर उष्ण वातावरणात मुरलीने पहिल्या उडीतच आपले वैयक्तिक सर्वोत्तम अंतर नोेंदवले; परंतु त्याला जेसविन के एल्ड्रिनच्या राष्ट्रीय रेकॉर्डपासून 0.01 मीटर मागे राहिला. मात्र, त्याची ही उडी 8.25 मीटर या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या क्वालिफाईंग मार्कला मागे टाकणारी होती. (World Athletics Championships)

गेल्या महिन्यात अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे झालेल्या एका स्पर्धेत मुरली श्रीशंकरने 8.29 मीटर लांब उडी मारून 8.25 मीटरचा मार्क पार केला होता; परंतु त्याने ही उडी हवेच्या मदतीने मारली असल्याकारणाने त्याला वर्ल्ड चॅम्पियनशिपची पात्रता मिळाली नव्हती. याशिवाय मुरलीने पॅरिस डायमंड लीगमध्ये 8.09 मीटर इतकी लांब उडी मारून तिसरे स्थान पटकावले होते. (World Athletics Championships)

या स्पर्धेेच्या पहिल्या फेरीत मुरलीसोबत जेसविन एल्ड्रिनने 7.83 मीटर लांब उडी मारून दुसरे स्थान पटकावले. त्याचबरोबर मुहम्मद अनिस याहिया याने 7.71 मीटर लांब उडी मारली. यावेळी एकूण 12 खेळाडूंनी अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरी सोमवारी होणार आहे.

हेही वाचा; 

Back to top button