Lionel Messi : मेस्सी बीजिंग विमानतळावर अर्धा तास ताटकळला | पुढारी

Lionel Messi : मेस्सी बीजिंग विमानतळावर अर्धा तास ताटकळला

बीजिंग; वृत्तसंस्था : एका मैत्रीपूर्ण सामन्यासाठी चीन दौर्‍यावर आलेल्या अर्जेंटिनाचा फुटबॉल स्टार लियोनेल मेस्सी याला बीजिंग विमानतळावर चिनी सुरक्षा एजन्सीकडून अडचणींचा सामना करावा लागला. (Lionel Messi)

मेस्सीला चीनच्या पोलिसांनी बीजिंग विमानतळावर ताब्यात घेतले होते. मेस्सीला त्याच्या व्हिसामध्ये काही समस्या असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, सुमारे 30 मिनिटांनंतर प्रकरण मिटले आणि मेस्सी बाहेर पडला. (Lionel Messi)

याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अर्जेंटिना गुरुवारी (15 जून) बीजिंगमधील वर्कर्स स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यात ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. मेस्सीच्या पासपोर्टमुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. लियोनेल मेस्सीकडे अर्जेंटिना आणि स्पॅनिश दोन्ही पासपोर्ट आहेत, पण मेस्सी अर्जेंटिनाच्या ऐवजी स्पॅनिश पासपोर्टवर प्रवास करत होता आणि त्याच्या स्पॅनिश पासपोर्टवर चीनचा व्हिसा नव्हता. त्यामुळे चीनच्या सीमा पोलिसांनी मेस्सीला विमानतळावर रोखले.

हेही वाचा;

Back to top button