जालना : वडीगोद्री येथील अपघातात कालव्यात बुडालेल्या तरुणांपैकी एकाचा मृतदेह सापडला | पुढारी

जालना : वडीगोद्री येथील अपघातात कालव्यात बुडालेल्या तरुणांपैकी एकाचा मृतदेह सापडला

वडीगोद्री; पुढारी वृतसेवा : दुचाकीवर निघालेल्या दोन तरुणास मुरुम वाहतूक करणाऱ्या हायवाने ओव्हरटेक करत मागुन जोराची धडक दिली. या धडकेतील दोघे तरुण डाव्या कालव्यात पडुन बेपत्ता झाले होते तर तिसरा तरुण जखमी झाला होता. आज (दि. १३) दुसऱ्या दिवशी युवराज संतोष गायकवाड (वय २१) या तरुणाचा मुतदेह २४ तासानंतर पिठोरी सिरसगावाजवळ सापडला आहे.

भोगलगाव (ता.गेवराई) युवराज संतोष गायकवाड (वय २०) चुलत भाऊ महेश किशोर गायकवाड (वय २१) दोन्ही तरुण जालना येथे कंपनीत कार्यरत होते. जालना येथून दोघे सोबतच भोगलगाव गावाकडे दुचाकीवर निघाले होते. यावेळी पाठीमागून येणाऱ्या हायवाने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला धडक दिली. अंबड वडीगोद्री रोडवर डाव्या कालव्याच्या पुलावर सोमवारी (दि. १२) दुपारी ४.३० वाजता ही घटना घडली. या धडकेत दोघेही तरुण डाव्या कालव्याच्या पाण्यात पडुन बुडाले होते. या तरुणांच्या शोधासाठी गावकऱ्यांनी कालव्यात उड्या मारुन शोधाशोध केली. मात्र त्यांचा शोध लागला नव्हता. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध घेतला परंतु कालव्यात वाहते पाणी असल्याने शोध घेण्यात अथडळा येत होता.

आज (दि. १३) ६ च्या दरम्यान वडीगोद्रीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेले पिठोरी सिरसगाव येथे युवराज गायकवाड हा पाण्यात तरंगताना आढळून आला. त्यानंतर घटनास्थळी गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप, पोलीस उपनिरीक्षक गणेश सुरवसे भेट देवुन पंचनामा केला. युवराज याचा मुतदेह उशिरा सापडल्याने शवविच्छेदन करून नातवाईकाच्या ताब्यात देणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश सुरवसे यांनी सांगितले. तर महेश गायकवाड हा तरुण अजून सापडला नसुन त्याचा शोध सुरु आहे.

Back to top button