Korean Actress Park Soo Ryun Dies : दक्षिण कोरियन अभिनेत्री पार्क सू-रयुनचा पायऱ्यांवरुन पडून मृत्यू | पुढारी

Korean Actress Park Soo Ryun Dies : दक्षिण कोरियन अभिनेत्री पार्क सू-रयुनचा पायऱ्यांवरुन पडून मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण कोरियाची प्रसिद्ध अभिनेत्री पार्क सू-रयून (Korean Actress Park Soo Ryun)  हिचा अवघ्या वयाच्या २९ व्या वर्षी अकाली निधन झाले. अलीकडेच ही कोरियन अभिनेत्री पार्कला ‘स्नोड्रॉप’ या सिरीजमध्ये दिसली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेजू बेटावर पायऱ्यांवरून खाली पडल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. जेजू बेटावरील एका कार्यक्रमात परफॉर्म करणार होती. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. (Korean Actress Park Soo Ryun Dies)

शनिवारी झाला अपघात (Korean Actress Park Soo Ryun Dies)

दक्षिण कोरियाच्या मीडिया पब्लिकेशन ओसेनने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री पार्क सू-रयुन सोबत शनिवारी पायऱ्यांवरून खाली पडण्याची ही घटना घडली. पार्क सू-रयुन घरी जात असताना ती पायऱ्यांवरून खाली पडली. यानंतर अभिनेत्रीला रुग्णालयात नेण्यात आले. जिथे तिच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र नंतर तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. पार्क सू-रयुनच्या कुटुंबाने तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

काय म्हणाली तिची आई

पार्कच्या आईने सांगितले की, तिचा मेंदू झोपेत आहे पण, अजनूही तिचे ह्रदय धडधडत आहे. कोणीतरी गरजू असेल ज्याला तिच्या अवयवांची गरज असेल. त्या व्यक्तीच्या रुपात तीचे नेहमी ह्रदय धडतधडत राहिल, त्यामुळे तिचे पालक म्हणून आम्ही समाधानाने जगू.

२०१८ मध्ये चित्रपट करिअरला सुरुवात 

अभिनेत्री पार्क सू-रयुन हिच्या चित्रपट करिअरची सुरुवात २०१८ मध्ये झाली. ती अनेक प्रोजेक्ट्सचा भाग आहे. यामध्ये फाइंडिंग मिस्टर डेस्टिनी, द डेज वुई लव्हड आणि सिद्धार्थ यांचा समावेश आहे. स्नोड्रॉपमध्ये, पार्क सू-रयुन विद्यापीठातील एका विद्यार्थ्याची भूमिका साकारताना दिसली. अभिनेत्रीचा मृतदेह ग्योन्गी प्रांतीय वैद्यकीय केंद्राच्या सुवॉन हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. १३ जून रोजी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.


अधिक वाचा :

Back to top button