Maharashtra Premier League : ‘एमपीएल’मध्ये नौशाद ठरला महागडा खेळाडू | पुढारी

Maharashtra Premier League : ‘एमपीएल’मध्ये नौशाद ठरला महागडा खेळाडू

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या महाराष्ट्र प्रीमियर लीगसाठी (एमपीएल) खेळाडूंच्या लिलावात नौशाद शेख हा सर्वात महागडा क्रिकेटपटू ठरला. कोल्हापूर टस्कर्सने नौशादला 6 लाख रुपयांची सर्वाधिक बोली लावली. एमपीएल 15 जून ते 29 जूनदरम्यान एमसीएच्या गहुंजे मैदानात खेळविली जाणार आहे. (Maharashtra Premier League)

एमपीएलच्या शिखर समितीने यावेळी सहभागी संघांची नावेही निश्चित केली. सुहाना मसालेवालेंचा संघ ‘पुणेरी बाप्पा’ नावाने ओळखला जाईल. ऋतुराज गायकवाड हा या संघाचा आयकॉन खेळाडू असेल. पुनीत बालन समूहाचा संघ ‘कोल्हापूर टस्कर्स’, ईगल इन्फ्रा. इंडियाचा संघ ‘ईगल नाशिक टायटन्स’, वेंकटेश्वरा इंडस्ट्रीजचा संघ ‘छत्रपती संभाजी किंग्ज’, जेटस् सिंथेसिसचा संघ ‘रत्नागिरी जेटस्’, कपिल सन्सचा संघ ‘सोलापूर रॉयल्स’ अशा नावाने ओळखला जाईल. (Maharashtra Premier League)

यावेळी कोल्हापूर टस्कर्सने नौशादला सर्वाधिक 6 लाख रुपयांची बोली लावून खरेदी केले. त्यानंतर दिव्यांग हिंगणेकरला रत्नागिरी जेटस्ने 4 लाख 60 हजार रुपयांची बोली लावली. साहिल औताडे (3 लाख 80 हजार), अंकित बावणे (2 लाख 80 हजार) या खेळाडूंनाही रत्नागिरीने मिळविले. सोलापूरने सत्यजित बच्छावला 4 लाख 60 हजार रुपयांना खरेदी केले. शमशुझमा काझी (2 लाख 80 हजार) छत्रपती संभाजीनगर किंग्ज, सिद्धेश वीर (2 लाख 60 हजार) ईगल नाशिक टायटन्सने, आशय पालकर आणि कौशल तांबे (प्रत्येकी 2 लाख 40 हजार) यांनादेखील नाशिकने खरेदी केले. पुणेरी बाप्पा संघाने सूरज शिंदेसाठी 2 लाख 40 हजार, तर रोहन दामलेसाठी 2 लाख रुपयांची बोली लावली.

हेही वाचा; 

Back to top button