MS Dhoni : मी पुन्हा येईन... धोनी! | पुढारी

MS Dhoni : मी पुन्हा येईन... धोनी!

आयपीएलच्या विजेतेपदासोबतच संपूर्ण देशाला उत्सुकता होती, ती महेंद्रसिंग धोनी निवृत्तीबाबत काय बोलणार याची. आयपीएलच्या बक्षीस वितरण सोहळ्यात समालोचक हर्ष भोगले यांनी धोनीला पहिलाच प्रश्न त्याच्या पुढील योजनेविषयी विचारला, यावेळी धोनीने आपण यावर्षी निवृत्ती घेणार नसल्याचे सांगितले, माझ्या शरीराने साथ दिली तर पुढील वर्षी मी पुन्हा येईन, असे सांगितले. ( MS Dhoni)

महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून याआधीच निवृत्त झाला आहे. याबाबत त्याने अचानक घोषणा करून धक्कातंत्रांचा अवलंब केला होता. तसाच धक्का तो आयपीएलच्या विजेतेपदासोबतच देणार, असा चाहत्यांचा समज होता. त्यामुळे त्याच्या प्रत्येक सामन्याला गर्दी होत होती; पण धोनीने आपण पुढील सिझन खेळण्याच्या मानसिकतेत असल्याचे सांगितले अन् त्याच्या निवृत्तीबाबतच्या चर्चांवर पूर्णविराम लागला. ( MS Dhoni  )

धोनी म्हणाला, यापेक्षा चांगला दिवस निवृत्तीसाठी असूच शकत नाही; परंतु ज्या पद्धतीने चाहत्यांनी प्रेम दाखवले आहे. त्यांना सध्यातरी मी फक्त धन्यवाद म्हणतो… आता चेंडू माझ्या कोर्टात आहे… 8-9 महिने आहेत आणि ते माझ्यावर आहे की तंदुरुस्ती राखून कमबॅक करतो की नाही… चेपॉकवरील पहिल्या सामन्यात सर्व माझ्या नावाची घोषणाबाजी करत होते. ते पाहून माझे डोळे पाणावले होते. मला डग आऊटमध्येच बसून राहावेसे वाटले. या क्षणाला मला आणखी आनंद घ्यायचाय. मी जसा आहे, तसा मी त्यांना आवडतो.. माझे पाय जमिनीवर आहेत म्हणून मी त्यांना आवडतो, असे धोनी म्हणाला. त्याने आणखी एक आयपीएल पर्व खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे चाहत्यांनी एकच कल्ला केला.

हेही वाचा; 

Back to top button