खिद्रापूर कोपेश्वर मंदिराच्या सभा मंडपात रोमन साम्राज्यातील पटखेळांचे सापडले अवशेष | पुढारी

खिद्रापूर कोपेश्वर मंदिराच्या सभा मंडपात रोमन साम्राज्यातील पटखेळांचे सापडले अवशेष

कुरुंदवाड; जमीर पठाण : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील कोपेश्वर मंदिराच्या सभामंडपात रोमन साम्राज्य व रोमन व्यापाराचा नाइन मेन्स मॉरीस व पंचखेलीया या पटखेळांचे कोरलेले अवशेष सापडले आहेत. दरम्यान, प्राचीन पटखेळ संवर्धन मोहिमेचे प्रमुख सोज्वळ साळी व स्नेहल बने यांनी हे अवशेष निदर्शनास आणून दिले आहे. या खेळाला मराठीत नवकंकरी व फरे-मरे या नावाने ओळखले जाते.

भारताच्या इतिहासात प्राचीन काळापासून ते 20 व्या शतकापर्यंत विविध देशातून व्यापार व्यापारासाठी, युद्धासाठी, पर्यटन स्थळे पाहण्यासाठी अनेक प्रवासी येऊन गेले आहेत. ज्यावेळी हे प्रवासी, व्यापारी महाराष्ट्रातून गेले त्यावेळी विश्रांतीच्या वेळी व पावसाळ्यात प्रवास न करता एका ठिकाणी मनोरंजन कसे होईल त्यासाठी त्यांच्या देशात असलेले पट-खेळ खेळत होते. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराच्या सभामंडपात हा खेळ कोरून ते खेळल्याचे दिसून आले आहे.

सभामंडपात कोरलेल्या अवशेषात श्रीलंकेतील विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा रोमन साम्राज्य व रोमन व्यापाराचा नाइन मेन्स मॉरीस व पंचखेलीया हा खेळ श्रीलंकेतील विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा खेळ आहे. हा खेळ बैठकीतील शर्यतीचा खेळ म्हणून ओळखला जातो.
या खेळाला मराठीत नवकंकरी व फरे-मरे या नावाने ओळखले जाते. तर इंग्रजीमध्ये दि मिल गेम, मेर्रील्स, नाईन पेंनी मार्ल, व उत्तर अमेरिकेत कॉवबॉव चेकर्स यानावाने ओळखले जाते. नाइन मेन्स म्हणजे 9 माणसे म्हणजेच हा खेळ 2 खेळाडू बसून खेळू शकतात. या खेळाचे इतर 3 प्रकार पाहावयास मिळतात ज्यात 3 मेन्स मॉरिस, 6मेन्स मॉरिस, 12 मेन्स मॉरिस हे आहेत. या खेळाचे नियम हे फुल्ली-गोळा प्रमाणे असले तरी हा धोरणात्मक खेळ असून या खेळांचा 2 हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे.

कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील हेमाडपंथी शैलीचा एक अजोड नमूना आहे. या मंदिरात असलेले शिल्प, त्यावरील आभूषणाने हे मंदिर नयनरम्य आहे. या पृथ्वीतलावरील प्राचीन काळापासून ते आजपर्यंत पर्यटक येत असल्याचा कोरीव इतिहास निदर्शनास आले आहे.

हेही वाचा;

Back to top button