Virat Kohli Instagram : विराट कोहलीचे २५ कोटी इन्स्टा फॅन | पुढारी

Virat Kohli Instagram : विराट कोहलीचे २५ कोटी इन्स्टा फॅन

भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने आयपीएलचा हंगाम तुफान गाजवला. त्याने सलग दोन शतकी खेळींसह सहा अर्धशतके ठोकत तब्बल 639 धावा ठोकल्या. विराटचा संघ जरी प्ले ऑफ गाठू शकला नसला तरी त्याने आपल्या दमदार कामगिरीने संघाला अनेक विजय मिळवून दिले. विराट आता क्रिकेटच्या मैदानावर आपल्या जुन्या फॉर्ममध्ये आला आहे. त्याने हाच आपला दमदार फॉर्म इन्स्टाग्रामवर देखील दाखवला. (Virat Kohli Instagram)

आयपीएल 2023 मध्ये धोनी पाठोपाठ विराट कोहलीला देखील प्रेक्षकांमधून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. आता इन्स्टाग्रामवरही त्याच्या फॅन फॉलोईंगमध्ये तुफान वाढ झाली आहे. विराट कोहलीने 250 मिलियन फॉलोअर्सचा (25 कोटी) टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे इतकी भीमकाय इन्स्टा फॅन फॉलोईंग असणारा विराट कोहली हा आशियातील पहिला खेळाडू ठरला आहे. (Virat Kohli Instagram)

विराट कोहलीने इन्स्टा फॅन फॉलोईंगमध्ये भारतीय क्रिकेट जगतातील धोनी आणि तेंडुलकर यांच्यासारखी मोठी नावे मागे टाकली आहेत. भारताचा मास्टर ब्लास्टरचे 40. 4 मिलियन इन्स्टा फॉलोअर्स आहेत. तर महेंद्रसिंग धोनीचे 42.5 मिलियन इन्स्टा फॉलोअर्स आहेत. विराट कोहली आशियातील सर्वात फॅन फॉलोईंग असलेल्या खेळाडूंच्या यादीत सर्वोच्च स्थानावर आहे.

जागतिक क्रीडा विश्वाचा विचार केला तर इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॅन फॉलोईंग असणार्‍या खेळाडूंमध्ये फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो हा आघाडीवर आहे. त्याचे इन्स्टावर 585 मिलियन फॅन फॉलोईंग आहे. त्यानंतर दुसर्‍या क्रमांकावर लियोनेल मेस्सीचा नंबर लागतो. त्याचे 463 मिलियन फॅन फॉलोईंग आहेत.

हेही वाचा;

Back to top button