Village Road : राज्यातील पांदण रस्त्यांचे होणार ग्रामीण मार्गात रुपांतर! ग्रामविकास व सार्वजनिक बांधकाम विभागाची लवकरच बैठक | पुढारी

Village Road : राज्यातील पांदण रस्त्यांचे होणार ग्रामीण मार्गात रुपांतर! ग्रामविकास व सार्वजनिक बांधकाम विभागाची लवकरच बैठक

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील ग्रामीण भागांचा मुख्य केंद्रबिंदू व विकासाचा पाया असणारे पांदण रस्त्यांना ग्रामीण मार्गात रूपांतरीत करण्याची योजना भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने हाती घेतली जाणार आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास विभागाची बैठक होणार आहे.

पांदण रस्त्यांचा गाव शिवार ते शेत-शिवार पोहोच मार्ग व दळणवळणासाठी उपयोग होतो. प्रामुख्याने दोन गावातील सांधा म्हणूनही या रस्त्यांची ओळख आहे. शेती जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास व्हावा व शेतकऱ्यांना दळणवळणाची सोय व्हावी यासाठी पांदण रस्त्याचे रुपांतर ग्रामीण मार्गात व्हावे अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात होती.

मूलभूत सुविधा पोहचविण्याकरिता या रस्त्यांचा विकास होण्याची गरज आहे, पांदण रस्त्याचा विकास करण्याची मागणी राज्यातील विविध स्तरावरून व लोकप्रतिनिधींकडून केली गेली.

Back to top button