विटा बाजार समितीच्या सभापतीपदी सुरेश पाटील तर उपसभापतीपदी रामचंद्र जाधव | पुढारी

विटा बाजार समितीच्या सभापतीपदी सुरेश पाटील तर उपसभापतीपदी रामचंद्र जाधव

विटा; पुढारी वृत्तसेवा : विटा बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या कदम गटाचे सुरेश तानाजी पाटील तर उपसभापतीपदी आमदार बाबर गटाचे रामचंद्र नामदेव जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सुरेश पाटील आणि रामचंद्र जाधव हे दोघेही सहकारी सोसायटी सर्वसाधारण गटा मधून निवडून आलेले आहेत. त्यामुळे निवडणू क पूर्व कदम – बाबर गटाच्या युतीत ठरल्या प्रमाणे सभापतीपद कडेगावला तर उपसभा पतीपद खानापूरला देण्यात आले आहे.

विटा बाजार समितीच्या सभापती उपसभापती निवडीचा कार्यक्रम आज गुरुवारी (दि. २५) पार पडला. सभापती पदासाठी कडेगाव तालुक्यातील सुरेश पाटील (रा.खेराडे वांगी) यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यांना अविनाश नामदेव जाधव यांनी सूचक म्हणून तर शरद शामराव मोरे यांनी अनुमोदन दिले. तर उपसभापती पदासाठी खानापूर तालुक्यातील रामचंद्र जाधव (रा.सुलतान गादे)यांचा अर्ज दाखल करण्यात आला. त्यांना विश्वनाथ रावसाहेब काटकर यांनी सूचक म्हणून तर जगन्नाथ दत्तू सुर्वे यांनी अनुमोदन दिले.

दोन्ही पदांच्या बिनविरोध निवडी जाहीर

दरम्यान दुपारी एक वाजता झालेल्या निवडीच्या या कार्यक्रमांमध्ये दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी आणि विट्याच्या सहाय्यक निबंधक दिपाराणी कोळेकर यांनी सभापतीपदी सुरेश पाटील आणि उपसभापती रामचंद्र जाधव या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.

उपसभापती निवड झालेले रामचंद्र जाधव हे खानापूर तालुक्यातील सुलतानगादे येथील पोल्ट्री व्यवसायिक आहेत. अत्यंत शांत आणि मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांचा लोकसंग्रह मोठा आहे. त्यांचे बंधू शत्रुघ्न जाधव हेही पोल्ट्री व्यवसायिक आहेत. दोघेही राजकारणात असतात. सुलतान गादे येथे गाव पातळीवरच्या राजकारणात त्यांचा मोठा दबदबा आहे आमदार बाबर गटाशी रामचंद्र जाधव हे एकनिष्ठ असल्याने त्यांना त्याचे फळ मिळाले, अशी प्रतिक्रिया बाबर गटातून व्यक्त होत आहे. दरम्यान निवड झाल्यानंतर सव्वाती सुरेश पाटील आणि उपसभापती रामचंद्र जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे रवीअण्णा देशमुख, विठ्ठलराव साळुंखे, सुरेश पाटील, युवराज इनामदार, यांच्यासह सर्व नूतन संचालक उपस्थित होते.

Back to top button