Virat Kohli New Record In IPL : विराटचा नवा ‘विक्रम’ अशी कामगिरी करणारा ठरला आयपीएलमधील पहिला खेळाडू | पुढारी

Virat Kohli New Record In IPL : विराटचा नवा 'विक्रम' अशी कामगिरी करणारा ठरला आयपीएलमधील पहिला खेळाडू

पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहलीने लीग स्टेजच्या शेवटच्या सामन्यात शतकी खेळी केली. विराटच्या शतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ‘करो या मरो’ सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली. विराट कोहलीने आयपीएल २०२३ च्या हंगामातील दुसरे शतक झळकावले. विराटच्या आजच्या शतकी खेळीनंतर त्याने नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने आयपीएलमध्ये ७ शतके झळकावली आहे. विराट नंतर क्रिस गेलच्या नावावर ६ तर जोस बटलरच्या ५ शतके आहेत.  (Virat Kohli New Record In IPL)

आरसीबीचे गुजरातसमोर १९८ धावांचे आव्हान (Virat Kohli New Record In IPL)

आयपीएल २०२३ च्या हंगामातील ग्रप स्टेजच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि गुजरात टायटन्स आमने-सामने आहेत. हा २०२३ च्या हंगामातील ७० वा सामना आहे. हा सामना बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. दरम्यान, गुजरातने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर १९७ धावा केल्या असून गुजरात समोर १९८ धावांचे आव्हान ठेवले आहे. (Virat Kohli New Record In IPL)

विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर आरसीबीला मोठी धावसंख्या उभारली आहे. विराटचे या हंगामातील हे दुसरे शतक आहे. तर आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक ठोकण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. आरसीबीकडून विराट कोहली ६१ चेंडूमध्ये १०१, फॅफ डू प्लेसीस १९ चेंडूमध्ये २८ धावा, ग्लेन मॅक्सवेल ५ चेंडूमध्ये ११ धावा, ब्रेसवेलने १६ चेंडूमध्ये २६ धावांचे योगदान दिले. गुजरात टायटन्सकडून नूर अहमदने २ तर मोहम्मद शमी, यश दयाल आणि राशिद खानने प्रत्येकी १ विकेट पटकावली. (Virat Kohli New Record In IPL)

हेही वाचलंत का?

 

Back to top button