GT vs RCB : आरसीबीचे गुजरातसमोर १९८ धावांचे आव्हान | पुढारी

GT vs RCB : आरसीबीचे गुजरातसमोर १९८ धावांचे आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल २०२३ च्या हंगामातील ग्रप स्टेजच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि गुजरात टायटन्स आमने-सामने आहेत. हा २०२३ च्या हंगामातील ७० वा सामना आहे. हा सामना बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. दरम्यान, गुजरातने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर १९७ धावा केल्या असून गुजरात समोर १९८ धावांचे आव्हान ठेवले आहे.

विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर आरसीबीला मोठी धावसंख्या उभारली आहे. विराटचे या हंगामातील हे दुसरे शतक आहे. तर आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक ठोकण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे.

आरसीबीकडून विराट कोहली ६१ चेंडूमध्ये १०१, फॅफ डू प्लेसीस १९ चेंडूमध्ये २८ धावा, ग्लेन मॅक्सवेल ५ चेंडूमध्ये ११ धावा, ब्रेसवेलने १६ चेंडूमध्ये २६ धावांचे योगदान दिले. गुजरात टायटन्सकडून नूर अहमदने २ तर मोहम्मद शमी, यश दयाल आणि राशिद खानने प्रत्येकी १ विकेट पटकावली.

हेही वाचलंत का?

Back to top button