Arjun Tendulkar Video : अर्जुन तेंडुलकरला चावला कुत्रा! LSG विरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबईला धक्का

Arjun Tendulkar Video : अर्जुन तेंडुलकरला चावला कुत्रा! LSG विरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबईला धक्का
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क : Arjun Tendulkar Viral Video: मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी या वेगवान गोलंदाजाला कुत्रा चावला असल्याचे समोर आले आहे. याचा खुलासा अर्जुनने स्वतः केला आहे.

आज (दि. 16) मुंबई इंडियन्ससमोर लखनौ सुपर जायंट्सचे आव्हान असणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. हा सामना लखनऊच्या अटल बिहारी बाजपेयी एकना स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. मात्र, या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकरचा कुत्र्याने चावा घेतला आहे. लखनऊ सुपर जायंट्सने या बाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये अर्जुन आपल्याला कुत्र्याने चावा घेतल्याचे सांगत आहे. (Arjun Tendulkar Viral Video)

व्हिडिओमध्ये अर्जुन तेंडुलकर मुंबईतील आपल्या सहकारी खेळाडूंना भेटल्याचे दिसते. त्याने कुत्र्याने चावा चावा घेतल्याची कबुली दिल्याचे या व्हिडीओमध्ये ऐकू येते. लखनौचा क्रिकेटपटू युधवीर सिंग चरक त्याला विचारतो की सर्व ठीक आहे ना? यावर अर्जुन म्हणतो, 'कुट्टा काटा है.' तर मोहसीन खान विचारतो कधी? यावर अर्जुन एक दिवस आधी असे म्हणतो.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.

दोन्ही संघांसाठी सामना महत्त्वाचा का आहे?

मुंबई इंडियन्स हा संघ पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी 7 जिंकले असून 5 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याचबरोबर लखनौ सुपर जायंट्स पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. लखनौ सुपर जायंट्सने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत, ज्यातील त्यांनी 6 जिंकले आहेत, तर 5 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. लखनौ आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला होता. (Arjun Tendulkar Viral Video)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news