Virender Sehwag : सूर्यकुमार यादवच्या बॅटिंग ऑर्डरवरून सेहवागचे मोठे विधान, म्हणाला… | पुढारी

Virender Sehwag : सूर्यकुमार यादवच्या बॅटिंग ऑर्डरवरून सेहवागचे मोठे विधान, म्हणाला...

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलची प्लेऑफ (IPL Playoff) लढत अधिक रोमांचक बनली आहे. साखळी सामन्यांची फेरी आता शेवटच्या टप्प्यात आली असून आतापर्यंत गुजरात टायटन्सला (GT) प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करता आले आहे, तर उर्वरित तीन जागांसाठी सात संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. आज (दि. 16) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सामना लखनौ सुपर जायंट्सशी (LSG) होणार आहे. गुणतालिकेत मुंबई इंडियन्स 14 गुणांसह तिसऱ्या तर एलएसजी 13 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. आजचा सामना कोणताही संघ जिंकला तरी त्याची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता वाढते. दोन्ही संघांना अजून दोन साखळी सामने खेळायचे असून ते जिंकणे महत्त्वाचे ठरणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) बॅटिंग ऑर्डरवरून वादग्रस्त विधान केले आहे.

स्टार स्पोर्ट्स क्रिकेट लाइव्ह या कार्यक्रमात सेहवाग म्हणाला, ‘सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्ससाठी नेहमी क्रमांक तीनवर फलंदाजीस येतो आणि वेगवान आणि फिरकी गोलंदाजांविरुद्ध दमदार फलंदाजी करतो. पण फलंदाजीचा क्रम कसा असावा? कोणत्या फलंदाजाला कितव्या क्रमांकावर पाठवायचे? हे सर्व संघ व्यवस्थापनावर अवलंबून असते. अता असे असले तरी, मला असे वाटते की सूर्याला अधिकाधिक चेंडूंचा सामना करण्याची संधी मिळाली पाहिजे.’

हरभजन सिंगने गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिलचे कौतुक केले आहे. गिलने सोमवारी (दि. 15) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 101 धावांची खेळी केली आणि गुजरात टायटन्ससाठी सामना जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. गिलशिवाय साई सुदर्शनने 47 धावांची खेळी खेळली, मात्र या दोघांशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. हरभजन म्हणाला, ‘गिलची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्याकडे सर्व प्रकारचे शॉट्स आहेत आणि तो सामन्याच्या परिस्थितीनुसार त्याची निवड करतो. जेव्हा तो लयीत असतो तेव्हा तो प्युअर क्रिकेटचे शॉट्स खेळतो.’

हेही वाचा :

 

 

Back to top button