MS Dhoni : धोनीला ‘या’ खेळाडूने लावला चूना! पावणेसात कोटी घेऊनही ठरला फ्लॉप

MS Dhoni : धोनीला ‘या’ खेळाडूने लावला चूना! पावणेसात कोटी घेऊनही ठरला फ्लॉप
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2023 मध्ये एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली सीएसकेची (CSK) कामगिरी शानदार राहिली आहे. चेन्नईने या हंगामात आतापर्यंत 13 सामने खेळले असून 7 सामन्यात विजय मिळवला आहे. खेळाडूंच्या उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर धोनीचा (MS Dhoni) संघ गुणतालिकेत दुस-या स्थानी कायम आहे. मात्र, या हंगामात चेन्नई संघात असा एक खेळाडू आहे ज्याने अत्यंत खराब कामगिरी केली असून तो संघासाठी डोकेदुखी ठरला आहे.

अंबाती रायुडू (ambati rayudu) असे या खेळाडूचे नाव असून, त्याला संघाने कोट्यवधी रुपये खर्चून कायम ठेवले होते. मात्र तो संघाच्या अपेक्षांवर खरा उतरू शकलेला नाही. त्याला सीएसकेने (CSK) यंदाच्या आयपीएलसाठी 6.75 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते, परंतु रायुडूची त्याच्या संघासाठी अतिशय खराब कामगिरी झाली आहे. त्याने या हंगामात 12 सामने खेळून 15.25 च्या सरासरीने केवळ 122 धावा केल्या आहेत. एका डावातील त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 27 आहे आणि त्याला या संपूर्ण हंगामात केवळ 8 चौकार आणि केवळ 6 षटकार मारता आले आहेत.

ग्रुप स्टेजमध्ये सीएसकेचा अजून एक सामना शिल्लक आहे. अशातच रायुडूची (ambati rayudu) खराब कामगिरी लक्षात घेता त्याला आणखी संधी देणे संघासाठी अडचणीचे ठरेल. जर चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये म्हणजेच टॉप-4 मध्ये पोहोचला, तर या महत्त्वाच्या सामन्यांमधून रायडूला वगळले जाऊ शकते.

चेन्नई टॉप-4 मध्ये स्थान मिळवू शकेल का?

सीएसकेने रविवारी (दि. 14) त्यांच्या होम ग्राउंड चेपॉकवर केकेआरविरुद्धचा सामना गमावला. मात्र, तरी ते दुसऱ्या स्थानावर कायम आहेत. आता चेन्नईने त्यांच्या शेवटचा सामना जिंकला तर त्यांचे प्लेऑफमधील स्थान पक्के होईल, पण जर त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले तर इतर काही संघांच्या विजय-पराजयावर धोनीच्या ((MS Dhoni)) संघाचा प्लेऑफमधील मार्ग निश्चित होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news