Dinesh Karthik | दिनेश कार्तिकचा खराब फॉर्म, अशा पद्धतीने रनआउट झाला की….

Dinesh Karthik | दिनेश कार्तिकचा खराब फॉर्म, अशा पद्धतीने रनआउट झाला की….
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL च्या गेल्या हंगामात स्टार असलेला दिनेश कार्तिक IPL 2023 मध्ये मात्र वाईट टप्प्यातून जात आहे. या हंगामात त्याला जास्त धावा करता आल्या नाहीत. शिवाय, तो विकेट कीपिंगमध्येही चुका करत आहे. त्याची रनिंग बिटवीन द विकेट हा देखील या हंगामात चर्चेचा विषय आहे. सोमवारी झालेल्या सामन्यातही कार्तिक रनआउट झाल्यामुळे तो चर्चेत आला आहे.

लखनौच्या अटलविहारी वाजपेयी स्टेडियमवर झालेल्या कमी धावसंख्येच्या आयपीएल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने लखनौ सुपर जायंटस्वर १८ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना फाफ डु प्लेसिस (४४) आणि विराट कोहली (३१) यांच्या ६२ धावांच्या दमदार सलामीनंतरही उर्वरित फलंदाजांनी निराशा केल्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने लखनौ सुपरजायंटस् संघाविरुद्ध ९ बाद १२६ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने नाणेफेक जिंकून लखनौ सुपर जायंटस्विरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला. डु प्लेसिस आणि विराट कोहली यांनी पॉवर प्लेमध्ये सावध फलंदाजी केली.

१८ वे षटक संपले तेव्हा आरसीबीने ६ गडी गमावून ११५ धावा केल्या होत्या. तेव्हा वानिंदू हसरंगा आणि दिनेश कार्तिक क्रीजवर होते. शेवटच्या दोन षटकात २० ते ३० धावा करून हे दोघे संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेतील, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र त्यानंतर १९ वे षटक यश ठाकूरने टाकले. त्याच्या ओव्हरचा पहिला चेंडू हसरंगाने खेळला. दुसऱ्यावर सिंगल घेतली, आणि तिसऱ्या चेंडूवर पुन्हा सिंगल घेत कार्तिकने स्ट्राईक हसरंगाकडे सोपवली. चौथा चेंडू हळू होता, हसरंगाने तो परत गोलंदाजाच्या दिशेने मारला. यावेळी ठाकूरने उडी मारून चेंडू पकडला. यावेळी कार्तिक एकेरी धाव घेण्यासाठी क्रीजच्या बाहेर होता. त्याने त्वरीत नॉन-स्ट्रायकरच्या दिशेला थ्रो मारला. कार्तिक क्रीजच्या एवढा बाहेर होता की थ्रो झाला तेव्हा तो फ्रेममध्येही नव्हता. तो ११ चेंडूत १६ धावा करून बाद झाला. त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला. अखेरीस, आरसीबीचा डाव नऊ गडी गमावून १२६ धावांवर संपला.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news