CSK vs PBKS : शेवटच्या चेंडूवर झालेल्या पराभवानंतर धोनी निराश; सांगितली ‘ही’ चूक | पुढारी

CSK vs PBKS : शेवटच्या चेंडूवर झालेल्या पराभवानंतर धोनी निराश; सांगितली 'ही' चूक

पुढारी ऑनलाईन डेस्क : CSk vs PBKS 2023 – आयपीएल 2023 मध्ये महेंद्रसिंह धोनीची टीम चेन्नईने सलग दोन सामने गमावले आहेत. राजस्थान रॉयल्सनंतर चेन्नईला पंजाब किंग्जविरुद्धही पराभवाचा सामना करावा लागला. पंजाब किंग्जने रोमहर्षक सामन्यात चार गडी राखून विजय मिळवला. संघाच्या या पराभवानंतर चेन्नईचा कर्णधार धोनीने वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीवर निराशा व्यक्त केली. पॉवरप्लेमध्ये गोलंदाजांना चांगली कामगिरी करण्याची गरज होती, असे धोनीने म्हटले आहे.

चेन्नई सुपर किंग्जचे 201धावांचे आव्हान पार करण्यासाठी उतरलेल्या पंजाबने आक्रमक खेळी केल्याने घरच्या मैदानावर चेन्नईचा संघ पराभूत झाला. चेपॉक येथे चेन्नईविरुद्ध 200 हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणारा पंजाब पहिला संघ ठरला. संघाच्या या पराभवानंतर धोनी म्हणाला की, पॉवरप्लेमध्ये गोलंदाजांना चांगली कामगिरी करण्याची गरज होती. फलंदाज मोठे फटके मारणार हे स्पष्ट होते, त्यामुळे गोलंदाजांना कशी गोलंदाजी करायची हे माहित पाहिजे होते. आमचे गोलंदाज नवीन आहेत. त्यांना आणखी अनुभव पाहिजे. मला वाटते, 200 ही चांगली धावसंख्या होती, पण शेवटी आम्ही कदाचित आणखी 10 धावा करू शकलो असतो, असे धोनीने म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button