

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स आमने सामने आहेत. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थानने यशस्वी जयस्वालच्या शतकी खेळीवर धावांचा डोंगर उभारला आहे. राजस्थानने २० षटकांअखेर २१२ धावा केल्या असून मुंबई समोर २१३ धावांचे आव्हान ठेवले आहे. (IPL MI vs RR)
राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने ६१ चेंडूमध्ये १२४ धावा केल्या. तर जॉस बटलर १९ चेंडूमध्ये १८ धावा, संजू सॅमसन १० चेंडूमध्ये १४ धावा आणि जेसन होल्डरने ९ चेंडूमध्ये ११ धावांचे योगदान दिले. राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल शिवाय कोणालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. यशस्वी जयस्वालने मुंबईच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. मुंबईकडून अर्शद खानने ३, पियुष चावलाने २ तर जोफ्रा आर्चर आणि रिले मेरेडिथने प्रत्येकी १ विकेट पटकावली. (IPL MI vs RR)