UEFA Europa League : मँनचेस्टर युनायटेडला मोठा धक्का; युरोपा लीगमधून बाहेर

UEFA Europa League : मँनचेस्टर युनायटेडला मोठा धक्का; युरोपा लीगमधून बाहेर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडमधील बलाढ्य फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड यूईएफए युरोपा लीगमधून बाहेर पडला आहे. त्यांना उपांत्यपूर्व फेरीत स्पॅनिश क्लब सेव्हिलाकडून पराभव पत्करावा लागला. दोन्ही संघांतील लेगच्या पहिला सामना २-२ असा बरोबरीत सुटला होता. दुसऱ्या लेगच्या सामन्यात सेव्हिलाने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन मँनचेस्टरचा ३-० ने पराभव केला. या सामन्यात मँनचेस्टरला निर्धारीत ९० मिनिटात एकाही गोलची परतफेड करता आली नाही. यामुळे सेव्हिलाने अॅग्रिगेटवर मँनचेस्टर युनायटेडचा ५-२ पराभव केला. सामन्यात एकतर्फी विजय मिळवत सेव्हिलाने एकूण ५-२ गुणांसह उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. (UEFA Europa League)

दोघांमधील पहिल्या लेग सामना २-२ असा बरोबरीत सुटला होता. मँचेस्टर युनायटेड या मोसमात खराब कामगिरी करणाऱ्या सेव्हिलाच्या संघाला सहज पराभूत करू असा त्यांचा विश्वास होता. सेव्हिला स्पॅनिश लीग 'ला लीगा' मध्ये १३ व्या क्रमांकावर आहे. तर इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये मँचेस्टर युनायटेड तिसऱ्या स्थानावर आहे. युरोपा लीगमध्ये सेव्हिलाने नेहमीच चमकदार कामगिरी केली आहे. सेव्हिलाने ही स्पर्धा सहा वेळा आपल्या नावावर केली आहे. (UEFA Europa League)

२०२०ची पुनरावृत्ती

२०२० मध्ये सेव्हिलाने उपांत्य फेरीत मँचेस्टर युनायटेडचा पराभव केला. पुन्हा एकदा युनायटेडचा संघ त्याचा बळी ठरला. सेव्हिलाचा फॉर्म 'ला-लीगा'मध्ये खराब असला तरी, युरोपा लीगमध्ये ते नेहमी सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करतात.

नासेरीने डागले दोन गोल

मँचेस्टर युनायटेडविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या लेगमध्ये युसेफ अन-नासेरीने सेव्हिलाकडून दोनदा गोल केला. त्याने ८ व्या मिनिटाला पहिला आणि ८१व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा गोल केला. तर, लॉक बेडने ४७ व्या मिनिटाला सेव्हिलाचा दुसरा गोल केला. मँचेस्टर युनायटेडला पराभूत केल्यानंतर सेव्हिला आता उपांत्य फेरीत जुव्हेंटसशी भिडणार आहे. युव्हेंटसने उपांत्यपूर्व फेरीत स्पोर्टिंगचा पराभव केला.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news