Virat Kohli : कोहलीची मोहालीत धमाल, रचले 3 मोठे रेकॉर्ड! | पुढारी

Virat Kohli : कोहलीची मोहालीत धमाल, रचले 3 मोठे रेकॉर्ड!

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या 27 व्या सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) धमाल केली. त्याने 556 दिवसांनी आरसीबीचे नेतृत्व करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे हा सामना कोहलीसाठी खास ठरला. पंजाब किंग्जविरुद्धच्या या सामन्यात त्याने आक्रमक खेळी करून अर्धशतक फटकावले आणि चाहत्यांची मने जिंकली.

खरं तर कोहलीने बर्‍याच दिवसांनी कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली. सामन्याच्या सुरुवातीला त्याने टॉस गमावला पण सामना जिंकला. आरसीबीच्या विजयात त्याने शानदार खेळी करून 3 खास विक्रम आपल्या नावावर केले.

600 चौकार पूर्ण

कोहलीने (Virat Kohli) 47 चेंडूंत 5 चौकार आणि 1 षटकारासह 59 धावांची खेळी केली. दरम्यान, कोहलीने आयपीएलमध्ये 600 चौकारही पूर्ण केले आहेत. आता त्याच्या नावावर 221 डावात 602 चौकारांची नोंद झाली आहे. आयपीएलमध्ये 600 चौकार पूर्ण करणारा कोहली आता दुसरा फलंदाज ठरला आहे. पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन या बाबतीत आघाडीवर आहे. त्याने 209 डावात 730 चौकार मारले आहेत.

100 सामन्यांमध्ये 30 किंवा त्याहून अधिक धावा

कोहलीने (Virat Kohli) या सामन्यात 30 धावा करताच एक आश्चर्यकारक इतिहासही रचला गेला. एकूण 100 सामन्यांमध्ये 30 किंवा त्याहून अधिक धावा करणारा कोहली आयपीएलच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे. कोहलीशिवाय कोणत्याही खेळाडूला ही कामगिरी करता आलेली नाही.

भागीदारीचा विक्रम

तिसरा विक्रम भागीदारीचा आहे. कोहलीने डुप्लेसिससह पहिल्या विकेटसाठी 137 धावा केल्या. यासह कोहली-डुप्लेसिस जोडी आरसीबीसाठी सलामीवीर म्हणून सर्वोच्च शतकी भागीदारी करणारी दुसरी जोडी ठरली आहे. दोघांनी 3 वेळा 100 हून अधिक धावांची भागीदारी केली आहे. सर्वाधिक शतकी भागीदारीचा विक्रम ख्रिस गेल आणि विराट कोहली यांच्या नावावर आहे. या जोडीने 4 वेळा शतकी भागीदारी केली आहे.

Back to top button
प्राजक्ता खुलली साडीत; पाहा प्राजक्ताचे सुंदर फोटो OSCAR Award : ब्लॅक ड्रेसमध्ये दीपिकाचा जलवा आई कुठे काय करते फेम रुपाली भोसलेचे हटके फोटो प्रियंकाचे व्हाईट ड्रेसमधील ग्‍लॅमरस फोटो वयात काय ठेवलंय! ऐश्वर्या नारकरच्या अदा पाहून वय विसरून जाल