MS Dhoni Anushka Sharma : बंगळूरच्या मैदानावर ‘धोनी-धोनी’चा जयघोष; अनुष्का शर्मा म्हणाली हे तर प्रेम… | पुढारी

MS Dhoni Anushka Sharma : बंगळूरच्या मैदानावर 'धोनी-धोनी'चा जयघोष; अनुष्का शर्मा म्हणाली हे तर प्रेम...

पुढारी ऑनलाईन डेस्क : चेन्नई सुपर किंग्जने सोमवारी आयपीएल साखळी सामन्यात आरसीबीला त्यांच्या होमग्राऊंडवरच ८ धावांनी पराभवाचा जबरदस्त झटका दिला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिह धोनी फलंदाजीला आला तेव्हा चाहत्यांनी धोनी…धोनी… असा जयघोष सुरू केला. धोनी क्रीझवर येताच मैदानावर फक्त धोनी, धोनी आवाज येत होता. यादरम्यान विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने धोनी.. धोनी…च्या घोषणांवर दिलेली रिअॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. “चाहते त्याच्यावर प्रेम करतात” अशी प्रतिक्रिया देखील अनुष्काने दिली आहे.

बंगळूरच्या घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात मैदानावर सुरुवातीपासूनच धोनी…धोनी असा जयघोष सुरू होता. चेन्नईच्या प्रत्येक विकेटनंतर ‘आम्हाला धोनी हवा’ असे चाहते ओरडत होते. चेन्नई सुपर किंग्जला डावाच्या १९ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर रवींद्र जडेजाच्या रूपाने सहावा धक्का बसला. यानंतर डावाचे शेवटचे दोन चेंडू बाकी असताना धोनी फलंदाजीला आला. धोनी क्रिजवर येताच चाहत्यांनी धोनीच्या नावाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. फक्त धोनी, धोनी असा आवाज संपूर्ण स्टेडियममधून घूमत होता. या सामन्यात बंगळूरला पाठिंबा देण्यासाठी विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा देखील उपस्थित होती. धोनीच्या नावाच्या घोषणा सुरू असताना अनुष्कालाही तिचा आनंद रोखता आला नाही. तिने चाहत्यांनी केलेल्या धोनीच्या घोषणाबाजीवर ‘चाहत्यांना त्याच्यावर प्रेम आहे’ असे म्हटले आहे. अनुष्काची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

धोनीचे ते दोन झेल अन् सारा नूरच पालटला

डेव्हॉन कॉन्वे (८३), शिवम दुबे (५२) यांची झंझावाती अर्धशतके व यष्टिरक्षक-कर्णधार धोनीच्या दोन अप्रतिम झेलाच्या बळावर चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल साखळी सामन्यात आरसीबीला ८ धावांनी पराभवाचा धक्का दिला. प्रारंभी, चेन्नईने ६ बाद २२६ धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात आरसीबीला ८ बाद २१८ धावांवर समाधान मानावे लागले. मॅक्सवेल व प्लेसिससारखे तडफदार फलंदाज जवळपास प्रत्येक चेंडूवर तुटून पडत चौकार-षटकारांची आतषबाजी करत असताना हा सामना चेन्नईच्या हातातून जवळपास सुटतच होता. पण, अनुभवी धोनीने प्रथम मॅक्सवेल व नंतर प्लेसिसचे उंच उडालेले झेल अगदी एकाग्रतेने टिपत या दोन्ही सेट फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आणि खऱ्या अर्थाने येथूनच या सामन्याचा सारा नूरच पालटला.

हेही वाचा : 

Back to top button