

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="ASC" orderby="post_date" view="circles" /]
पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई इंडियन्सने पहिल्या सलग दोन पराभवानंतर संघाची गाडी विजयी ट्रॅकवर आणत सलग दोन विजय मिळवले. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रविवारी मुंबई इंडियन्स आणि केकेआर सामन्यात सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडूलकरला संधी मिळाली. सचिनने १९८९ मध्ये पाकिस्तानच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तो दिवस त्याच्यासाठी खूप खास होता. पण कालचा रविवार देखील त्याच्यासाठी अविस्मरणीय ठरला आहे. या सामन्यानंतर सचिनने मुलगा अर्जुनसाठी भावनिक संदेश लिहिला आहे.
अर्जुन गेल्या तीन वर्षांपासून मुंबई इंडियन्सचा भाग आहे, परंतु रविवारी त्याला प्रथमच इलेव्हनमध्ये स्थान मिळाले. आयपीएलमधील त्याच्या पहिल्याच सामन्यात त्याला पहिले आणि तिसरे षटक टाकण्याची जबाबदारी देण्यात आली. केकेआरविरुद्ध त्याने दोनच षटक टाकले. या दोन षटकामध्ये त्याने १७ धावा दिल्या. पण तो दिवस त्याच्यासाठी खूप मोठा होता. आणि त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे नेट प्रॅक्टिसपासून वडिलांचे (सचिनचे) मार्गदर्शन शिवाय संपूर्ण सामन्यादरम्यान मैदानावर उपस्थित राहून सचिनचे मिळालेले प्रोत्साहन.
सचिन मैदानात असो वा बाहेर नेहमीच तो खेळाडूंना प्रेरणा देत असतो. तो मुंबई संघाचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. तो प्रत्येक सामन्यात मैदानावर उपस्थित राहून खेळाडूंना मार्गदर्शन व प्रोत्साहन देतो. रविवारीही सचिन सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सच्या डगआउटमध्ये होता. सामना संपल्यानंतर सचिनने सोशल मीडियावर आपल्या मुलासाठी एक अतिशय भावनिक संदेश लिहिला. त्याचा हा मेसेज चांगलाच व्हायरल होत आहे. त्याने संदेशात लिहिले की, "अर्जुन, क्रिकेटर म्हणून तू तुझ्या प्रवासात आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहेस. एक वडील म्हणून मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि खेळाबद्दलही मला खूप आवड आहे. मला माहित आहे की तू खेळाला योग्य तो आदर देत राहशील आणि खेळ तुला आवडेल. ही तुझ्या सुंदर प्रवासाची फक्त सुरुवात आहे, तुला खूप खूप शुभेच्छा!"
हेही वाचा :