Kohli vs Ganguly : कोहलीचा मोठा निर्णय, गांगुलीला इन्स्टाग्रामवरून केले अनफॉलो! | पुढारी

Kohli vs Ganguly : कोहलीचा मोठा निर्णय, गांगुलीला इन्स्टाग्रामवरून केले अनफॉलो!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Kohli vs Ganguly : आयपीएलमध्ये 20 वा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगला होता. पण या सामन्यात असा वाद पाहायला मिळाला ज्याची सतत चर्चा होत आहे. कोहलीने या सामन्यात तिसरे अर्धशतक झळकावले आणि ऑरेंज कॅपच्या यादीत अव्वल स्थान गाठले. अशा स्थितीत दिल्ली कॅपिटल्सला सलग पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, यादरम्यान विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला.

सोशल मीडियावर विराट-गांगुलीची चर्चा (Kohli vs Ganguly)

या सामन्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले ज्यात विराट कोहली सौरव गांगुलीकडे पाहत होता. विराट क्षेत्ररक्षण करत होता आणि सौरव गांगुली डगआउटमध्ये बसला होता. सामन्याच्या 18 व्या षटकात हे घडले जेव्हा आरसीबीला दिल्लीविरुद्ध विजयासाठी फक्त 1 विकेटची आवश्यकता होती. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये विराटने गांगुलीशी हस्तांदोलन केले नाही. पण या सगळ्यात या प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे कारण कोहलीने चक्क गांगुलीला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचे समोर आले आहे.

रिपोर्टनुसार, कोहली आधी दादांना फॉलो करायचा पण आता विराटने त्याला फॉलो करणे बंद केले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, कोहलीचे ही कृती सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. 2021 मध्ये कोहलीने टीम इंडियाचे टी-20 कर्णधारपद सोडले होते. त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरूनही काढून टाकण्यात आले. यादरम्यान बराच वाद झाला आणि गांगुली-कोहलीचे संबंध बिघडल्याचे समोर आले. गांगुली त्या काळात बीसीसीआयच्या अध्यक्षपदी होता. कर्णधारपद सोडण्याबाबत बीसीसीआयने आपल्याशी कोणतीही चर्चा केली नसल्याचा आरोपही विराटने पत्रकार परिषदेत केला होता.

हा वाद इतका वाढला की कोहलीने काही महिन्यांतच कसोटी कर्णधारपद सोडले. द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-1 अशा पराभवानंतर त्याने हे पाऊल उचलले होते.

काय घडले आयपीएलमधील त्या सामन्यानंतर… (Kohli vs Ganguly)

डीसी आणि आरसीबी यांच्यातील सामन्यानंतर दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दादा आणि किंग कोहली एकमेकांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीने डीसीचा 23 धावांनी पराभव केला. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा हा सलग 5 वा पराभव आहे. या सामन्यात विराट कोहलीने शानदार कामगिरी करत 50 धावांची मौल्यवान खेळी केली.

गांगुली-कोहलीने हस्तांदोलन केले नाही! (Kohli vs Ganguly)

विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यातील ‘वाद’ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. शनिवारी दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केल्यानंतर विराट कोहली डीसी टीमच्या सदस्यांशी हस्तांदोलन करत असताना सौरव गांगुली त्याच्यासमोर आल्यावर त्याने दुर्लक्ष केले आणि ‘दादा’शी हस्तांदोलन करणे टाळले. यापूर्वी, आणखी एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये सौरव गांगुली सीमारेषेवर उभ्या असलेल्या विराट कोहलीकडे दुर्लक्ष करताना दिसले. (Kohli vs Ganguly)

लाइव्ह मॅचमध्ये कोहलीने गांगुलीला दिली खुन्नस

आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्ससमोर निर्धारित 20 षटकांत 175 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नरच्या दिल्ली कॅपिटल्सचा 23 धावांनी पराभव झाला. यावेळी दिल्लीच्या डावात विराटची आक्रमकता स्पष्ट दिसली. खासकरून मोहम्मद सिराज दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील 18 वे षटक टाकत होता. त्याच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर स्ट्राइकवर असलेला अमन खान मोठा शॉट खेळताना झेलबाद झाला. त्याचा झेल कोहलीने टिपला. किंग कोहलीने हा झेल घेतल्यानंतर सीमारेषेवर खुर्चीत बसलेल्या सौरव गांगुलीकडे एकटक पाहिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय होता संपूर्ण वाद? (Kohli vs Ganguly)

खरं तर, 2021 मध्ये आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी विराट कोहलीने आरसीबी आणि भारताच्या टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्याला वनडे संघाच्या कर्णधारपदावरूनही हटवण्यात आले. याबाबत विराटने सांगितले की, आपण वनडे संघाचे कर्णधारपद सोडण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही, मात्र हा निर्णय बोर्डाने घेतला आहे.

टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर गांगुलींनी विराटला हा या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले होते. मात्र द. आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीने पत्रकार परिषदेत याचा इन्कार केला आणि माझ्याशी असे कोणीही बोलले नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिकेतील पराभवानंतर त्याने कसोटी संघाचे कर्णधारपदही सोडले. येथूनच सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्यातील वाद चव्हाट्यावर येऊ लागला.

Back to top button